Matheran E-Rikshaw Latest News : माथेरान (Matheran) हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. माथेरान मुंबईपासून फक्त 80 किमी आणि पुण्यापासून 120 किमी अंतरावर वसलेलं आहे. हजारो पर्यटक विकेंड ट्रिपसाठी माथेरानला येतात. कारण या ठिकाणी वर्षभर थंड आणि आल्हाददायक वातावरण असतं. विशेषत: पावसाळ्यात हिरवागार निसर्ग, धबधबे आणि ट्रेकिंगचा थरार माथेरानमध्ये पाहायला मिळतो. पंरतु, आता माथेरानच्या ई-रिक्षाच्या सुविधेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. माथेरानमध्ये येत्या 10 फेब्रुवारीपासून इ-रिक्षा बंद असणार आहेत.
माथेरानमध्ये हात रिक्षा ओढणारे श्रमिक प्रवाशांसाठी रात्रंदिवस फेऱ्या मारत असतात. त्यांचे कष्ट कमी होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पर्यावरण पुरक इ रिक्षा देण्याचा निर्णय दिला होता.मात्र 6 महिन्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे येत्या 10 फेब्रुवारीपासून इ रिक्षा बंद असणार आहेत. माथेरानमधील 94 हातरिक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडीला 20 हात रिक्षा चालकांना इ-रिक्षा मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर श्रमिक रिक्षा संघटनेनं ई-रिक्षा आणि हातरिक्षा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा >> आधरवाडी तुरुंगासमोरील 'त्या' बंगल्याची का होतेय चर्चा? KDMC अधिकाऱ्यांनी पाहणी करताच 'ते' सत्य आलं समोर
सुप्रीम कोर्टाने 6 ऑगस्ट 2025 रोजी दिला होता महत्त्वाचा आदेश
सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी यासंदर्भात आदेश दिला होता.हातरिक्षा ही अमानवीय प्रथा असून सहा महिन्यांच्या आत 94 हातरिक्षा बंद करण्याचे निर्देश गवई यांनी दिले होते. पर्यायी व्यवस्था म्हणून ई-रिक्षांच्या वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. परंतु, आज सहा फेब्रुवारीला ही मुदत संपत आहे. अशातच श्रमिक रिक्षा संघटनेनं ई-रिक्षा आणि हातरिक्षा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
माथेरानची वैशिष्ट्ये काय?
- भारतातील एकमेव ‘व्हेईकल-फ्री' हिल स्टेशन
- माथेरानमध्ये कार,बस,दुचाकीला प्रवेश नाही.
- हवा स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असल्याने वातावरण अत्यंत आल्हाददायक.
- नेरल–माथेरान हेरिटेज टॉय ट्रेन
- अरुंद वळणे,दरीतून जाणारा मार्ग आणि निसर्गरम्य दृश्ये
- घनदाट हिरवाई आणि जैवविविधता
- संपूर्ण माथेरान दाट जंगलांनी वेढलेले आहे.
- इथे 200+ प्रकारची झाडे आणि वनस्पती आढळतात.
- शहरांपासून दूर, शांत आणि प्रदूषणरहित वातावरण.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world