Makar Sankranti 2025: वर्षभरात बारा राशींतून सूर्याची बारा संक्रमणे होत असतात, पण मकर संक्रांतीला होणारे संक्रमण सर्वाधिक महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. दरवर्षी 14 जानेवारीला हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मानुसार या दिवशी स्नान आणि दान करणे अतिशय शुभ मानले जाते. पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि गरजूंना दान केल्यास घरामध्ये सुख-शांतता नांदते, असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करण्यासाठी कोणती वेळ (Makar Sankranti Snan Shubh Muhurat 2025) सर्वात शुभ ठरेल? याबाबत माहिती जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करण्यासाठीचा शुभ मुहूर्त (What Is The Auspicious Time For Bathing On Makar Sankranti?)
मकर संक्रांतीच्या दिवशी महा पुण्यकालचा कालावधी सकाळी 8.54 वाजेपासून ते संध्याकाळपर्यंत 4.45 वाजेपर्यंत असणार आहे. तर ब्रह्म मुहूर्त पहाटे 5.27 वाजेपासून ते सकाळी 6:21 वाजेपर्यंत आहे. तर या मुहूर्तावर तुम्ही गंगा स्नान करू शकता.
(नक्की वाचा: New Year 2025 Festival: नववर्षात मकरसंक्रांती, होळी, दिवाळी कधी आहे? सर्व सणांची यादी पाहा एका क्लिकवर)
मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करण्याचे महत्त्व (Significance of Ganga Snan on MakarSankranti)
मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्यास पुण्य लाभते, असे म्हणतात. गंगा स्नानामुळे मृत्यूनंतर मोक्ष मिळते, अशीही मान्यता आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा? (Makar Sankrant Mantra)
ॐ ह्रीं सूर्याय नमः.
ॐ सूर्याय आदित्याय श्री महादेवाय नमः
नमस्कारं च देवेशं लोकनाथं जगतां पतिं. सूर्यमस्तकं बध्यं ब्राह्मणं बद्धमाश्रयेत्॥
ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।।
नमस्कारं च देवेशं लोकनाथं जगतां पतिं।
सूर्यमस्तकं बध्यं ब्राह्मणं बद्धमाश्रयेत्॥
(नक्की वाचा: New Year 2025 Festivals And Important Days: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर)
मकर संक्रांतीचे महत्त्व (Importance of Makar Sankranti 2025)
जेव्हा सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या दक्षिणकेडून उत्तरेकडे सरकू लागतो, त्यावेळेस उत्तरायण सुरू होते. यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. हा काळ म्हणजे हिवाळा ऋतूची समाप्ती दर्शवते. त्यामुळे मकर संक्रांती सण केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर ऋतूनुसार देखील महत्त्वाचा ठरतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)