एकटेपणामुळे शरीरावर होतात हे गंभीर नकारात्मक परिणाम, जाणून घ्या काय करावे आणि काय करू नये?

Loneliness Symptoms And Treatments: एकटेपणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतात इतके गंभीर परिणाम आणि हा त्रास दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शकतो. या समस्येकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.

Advertisement
Read Time: 2 mins

Loneliness Symptoms And Treatments: नोकरी, व्यवसाय आणि घरातील कामामध्ये काही माणसं स्वतःला इतके बांधून ठेवतात की त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. केवळ घरातून ऑफिस आणि ऑफिसमधून घर अशी त्यांची दिनचर्या असते. बदलत्या लाइफस्टाइलनुसार माणूस प्रगती करत आहे, पण दुसरीकडे तो तितकाच एकाकीही होत आहे. बहुतांश लोकांच्या जीवनामध्ये मित्र-मैत्रिणीही नसतात, ज्यांच्यासमोर ते त्यांच्या मनातील भावना शेअर करू शकतील. 

ऑफिसमधून घरी गेल्यानंतरही या लोकांच्या जीवनामध्ये वेगळे असे काही घडत नाही. घरी जाणे, टीव्ही पाहणे, जेवणे आणि यानंतर झोपणे इतकीच त्यांची दिनचर्या असते. तुम्ही देखील अशाच प्रकारचे रूटीन फॉलो करत आहात का? तर ते ठीक नाहीय. 

कारण एकटेपणामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. यामुळे कित्येक प्रकारच्या आजारांना आयते निमंत्रण मिळते. एकटेपणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतात आणि हा त्रास दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शकतो.  

(नक्की वाचा: Warm Water & Blood Pressure : गरम पाणी प्यायल्याने रक्तदाब वाढतो का?)

एकटेपणामुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात?

- एकटेपणामुळे तणाव आणि चिंता यासारख्या समस्या वाढतात.
- कोणताही निर्णय घेण्यास आपण असमर्थ आहोत, असे वाटू लागते. 
- अपुऱ्या झोपेमुळे भूक लागत नाही.  
- हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ लागतात. 

(नक्की वाचा: संत्री ते सफरचंद... रिकाम्या पोटी चुकनही खाऊ नका हे 6 फळं, अन्यथा होतील गंभीर परिणाम)

एकटेपणा दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे?

- एकटेपणा दूर करण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडणे, लोकांमध्ये राहणे आवश्यक आहे. 
- मित्रांना भेटा, त्यांच्याशी गप्पागोष्टी करा-संवाद साधा.
- कोणत्याही प्रकारचा तणाव जाणवत असेल तर कुटुंबातील सदस्यांशी बातचित करा. जास्तीत जास्त वेळे त्यांच्यासोबत घालवावा. 
- एखादी नवीन गोष्टी शिकावी किंवा एखादी अ‍ॅक्टिव्हिटी करावी. उदाहरणार्थ पुस्तक वाचा. स्वतःच्या मनातील भावना कागदावर लिहून काढा आणि जे काही लिहिले आहे ते पुन्हा वाचा. 
- नियमित व्यायाम करा.   
- एकटेपणाची समस्या दूर होऊ शकते, केवळ तुम्हाला या नियमांचे नियमित पालन करणे आवश्यक आहे.

(नक्की वाचा: दररोज 10 हजार पावलं चालल्याने काय होतं? वयानुसार रोज किती स्टेप्स चालायला हवीत)