
Warm Water & Blood Pressure : कोरोनापासून अनेकजणं नियमित गरम पाणी पिताना दिसतात. अनेकांना सकाळी उठल्यावर कोमट पाणी सवय असते. कोमट पाणी गळ्यासाठी आल्हाददायक आणि थंडीत पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं. अनेकांना वाटतं की, कोमट किंवा गरम पाणी (Warm or hot water) प्यायल्याने रक्तदाब वाढतो आणि बीपी असलेल्या रुग्णांना याचा फटका बसू शकतो. खरंच गरम पाणी बीपीच्या रुग्णांसाठी (BP patients) त्रासदायक असतं का?
कोमट पाणी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो आणि यामुळे पचनक्रिया सुधारते. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. सर्दी-खोकल्याने त्रासलेल्यांना कोमत पाणी नियमित प्यावं. यामुळे आरोग्याने अनेक फायदे मिळतात आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
नक्की वाचा - दररोज 10 हजार पावलं चालल्याने काय होतं? वयानुसार रोज किती स्टेप्स चालायला हवीत
कोमट पाणी प्यायल्याने रक्तदाबात कोणताही बदल होत नाही. उच्च रक्तदाब असणारी व्यक्तीही कोमट पाणी पिऊ शकते. यामुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही. उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी प्रत्येक ऋतूत पुरेसं पाणी प्यायला हवं. शरीर हायड्रेट राहिलं तर बीपी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकेल. लोक आपल्या कंफर्टनुसार कोमट किंवा साधं पाणी पितात. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा आहार चांगला हवा. पुरेशी झोपही घ्यायला हवी. त्याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्यायला हवीत. गरम पाण्याने अंघोळ केल्याने रक्त प्रवाह आणि सर्कुलेनशन चांगलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world