सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या जगभरातील अब्जावधी युजर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सॲप (WhatsApp) ची मालकी असलेल्या 'मेटा' (Meta) कंपनीने युजर्ससाठी पेड सबस्क्रिप्शन प्लॅन सुरू केले आहेत. याचा थेट परिणाम या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर होणार आहे. कंपनीने आपली कमाई वाढवण्यासाठी हे नवीन 'प्लस व्हर्जन' बाजारात आणले आहे.
यापूर्वी मायक्रोब्लॉगिंग ॲप 'एक्स'ने अशाच प्रकारे सशुल्क सेवा (Paid Service) सुरू केली होती, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. आता याच धर्तीवर मेटानेही पाऊल उचलले असून, जगभरातील युजर्ससोबतच भारतीय युजर्सनाही या 'प्लस व्हर्जन'साठी पैसे खर्च करावे लागणार आहेत.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
'प्लस व्हर्जन'मध्ये काय असणार खास?
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या प्लस व्हर्जनचे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना काही विशेष सुविधा मिळतील. प्लस सबस्क्राइबर्सना काही विशेष टूल्स आणि कस्टमायझेशन फीचर्स दिले जातील. हे प्रगत फीचर्स आतापर्यंत मोफत मिळत होते, परंतु यापुढे ते नेहमीच्या मोफत व्हर्जनमध्ये उपलब्ध नसतील.
महिनाभरायला मोजावे लागणार 'इतके' रुपये
मेटाने या तिन्ही ॲप्सच्या प्रीमियम फीचर्ससाठी जागतिक स्तरावर त्यांचे मासिक प्लॅन जाहीर केले आहेत. इंस्टाग्राम प्लस सुमारे 387 रुपये, फेसबुक प्लस सुमारे 387 रुपये आणि व्हॉट्सॲप प्लस सुमारे 290 रुपये असू शकतात. मेटाने जागतिक किमती जाहीर केल्या असल्या, तरी अद्याप भारतासाठी मासिक प्लॅनची अधिकृत किंमत किती असेल, याची नेमकी घोषणा केलेली नाही.
(नक्की वाचा- Iran War: जगाचं टेन्शन वाढलं! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले! स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात ड्रोन स्टेशन उद्ध्वस्त)
नेहमीचे मोफत व्हर्जन पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असले, तरी नवीन आणि प्रगत टूल्स वापरू इच्छिणाऱ्या युजर्सना आता दरमहा खिसा खाली करावा लागणार आहे. मेटाच्या या मोठ्या निर्णयामुळे सोशल मीडिया जगतात आता नवीन चर्चा रंगू लागली आहे.