भारताच्या यूपीआय प्रणालीने आता एका नवीन उंची गाठली आहे. सवयीनुसार आपण फोन काढून क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करतो, पण आता ही पद्धत कालबाह्य होणार आहे. कारण फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटा आणि रे-बॅन (Ray-Ban) यांनी विकसित केलेल्या स्मार्ट ग्लासेसमुळे आता बोलून आणि डोळ्यांनी पाहून यूपीआय व्यवहार करणे शक्य झाले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे यूपीआय पेमेंट करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे.
कसे करायचे पेमेंट?
पेमेंट करण्यासाठी तुम्हाला फक्त क्यूआर कोडकडे चेहरा वळवायचा आहे आणि 'स्कॅन ॲण्ड पे' असे तोंडाने बोलायचे आहे. त्यानंतर रक्कम सांगायची आणि काही सेकंदात व्यवहार पूर्ण होईल. महत्त्वाचे म्हणजे, हे यूपीआय पेमेंट फीचर सध्या फक्त व्हॉट्सॲप यूपीआय सेवेद्वारेच काम करेल. गुगल पे (Google Pay) किंवा फोन पे (PhonePe) सारख्या सेवांचा सध्या वापर करता येणार नाही. व्हॉट्सॲप यूपीआय काही सेकंदात ॲक्टिव्हेट करता येते. यामुळे फोन खिशातून बाहेर न काढता, हात न वापरता पेमेंट करण्याचा अनुभव मिळेल.
(नक्की वाचा- Toll Fee Rules: टोलच्या नियमांमध्ये 17 वर्षांनंतर होणार मोठे बदल; प्रवाशांना कसा होतील फायदे)
मेटा रे-बॅन ग्लासेसची खासियत
मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीने रे-बॅनसोबत मिळून हा स्मार्ट चष्मा तयार केला आहे. हा चष्मा गेल्या 3 वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे. या चष्म्याच्या उजव्या लेन्सवर एक छोटी स्क्रीन लावलेली आहे. या स्क्रीनवर तुम्हाला मेसेज दिसतील, व्हिडिओ कॉल करता येईल, गुगल मॅप वापरता येईल, फोटो पाहता येतील आणि म्युझिक कंट्रोल करता येईल.
You can now just stare at an UPI QR code till your bill is paid. (Meta Ray Bans can scan the QR code and pay it via your Whatsapp UPI account)
— Arnav Gupta (@championswimmer) October 23, 2025
Try it next time when paying and see the shocked reaction of the shopkeepers 😅 pic.twitter.com/qWYaGwyqj5
कॅमेरा आणि कॉल
चष्म्याच्या डाव्या बाजूला कॅमेरा बसवलेला आहे, ज्यातून तुम्ही छोटे व्हिडिओ रेकॉर्ड करून थेट इंस्टाग्रामवर अपलोड करू शकता. तसेच, कानाजवळ कॉल उचलण्याची (Receive) सोयही उपलब्ध आहे.
(नक्की वाचा- Prada's Safety Pin: अबब! एवढी महाग सेफ्टी पिन; प्राडाच्या एका पिनची किंमत ऐकून थक्क व्हाल!)
किंमत किती आहे?
या नवीन यूपीआय फीचरसाठी ग्राहकांना नवा मॉडेल खरेदी करण्याची गरज नाही. 2023 चा जुना मॉडेलही पुरेसा आहे. हा मॉडेल भारतात उपलब्ध असून, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून 29,900 रुपये या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. तंत्रज्ञान सध्या थोडे महाग असले तरी, भविष्यात ते नक्कीच स्वस्त होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world