जाहिरात

Monsoon Emergency Kit : 10 वस्तू घरात अवश्य ठेवा; आजच तयार करा मान्सून आपत्कालिन किट

मान्सून नागरिकांना दिलासा घेऊन येतो, मात्र पूर, पाणी साचणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांमुळे अडचणीही उद्भवतात.

Monsoon Emergency Kit : 10 वस्तू घरात अवश्य ठेवा; आजच तयार करा मान्सून आपत्कालिन किट
file photo

Monsoon Emergency Kit : मान्सून नागरिकांना दिलासा घेऊन येतो, मात्र पूर, पाणी साचणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांमुळे अडचणीही उद्भवतात. त्यामुळे हवामान खराब होण्यापूर्वी प्रत्येक घरात पावसाळी आपत्कालीन किट तयार ठेवणं महत्त्वाचं आहे. अशात पिण्याच्या पाण्यासह आवश्यक औषधांसह काही वस्तू अडचणीच्या काळात उपयोगी ठरू शकतं. विशेषत: जेव्हा सर्वसामान्य सेवांवरही परिणाम होतो. 

पिण्याचं पाणी आणि टिकणारं अन्न...

जर तुमच्या परिसरात पूरस्थितीमुळे पाणी पुरवठा खंडित होण्याची भीती असते, अशावेळी कमीत कमी २ ते ३ दिवसांसाठी पुरेसं पाणी साठवून ठेवा. यासह जे पदार्थ फ्रिजशिवाय बराच काळ टिकून राहू शकतात. शिवाय जे पदार्थ शिजविण्यासाठी फार वेळ लागणार नाही. उदा. बिस्कीट, एनर्जी बार, सुका मेवा, डबाबंद भोजन आणि इन्स्टंट फूड इ.

फर्स्ट एड किट आणि आवश्यक औषधं...

मान्सून आपत्कालिन किटमध्ये फर्स्ट एड किट अवश्य ठेवा. यामध्ये बँडेज, अँटीसेप्टिक औषध, कॉटन, गॉज, मेडिकल टेप, वेदनाक्षमवणारी औषधं आणि थर्मामीटरसारख्या वस्तूंचा समावेश असावा. याशिवाय घरातील सदस्यांसाठी कमीत कमी एक आठवड्यांपर्यंतची औषधं आरक्षित करून ठेवा. ORS चे पॅकेटही ठेवा, गरज पडल्यास शरीरात पाणी आणि मिठाची कमतरता पूर्ण करता येईल. लहान मुलं, वृद्ध आणि  दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची नियमित औषधे देखील किटमध्ये समाविष्ट करावीत.

टॉर्च, बॅटरी आणि पॉवर बँक...

मुसळधार पावसादरम्यान वीज पुरवठा खंडित होत असते. अशात एक टॉर्च, अतिरिक्त बॅटरी, पूर्णपणे चार्ज केलेलं पॉवर बँक आणि मोबाइल चार्जिंग केबल स्वत:जवळ ठेवा. जर बराच काळ वीज पुरवठा खंडीत राहिला तर बॅटरीने चालणारे दिवे फायदेशीर ठरू शकतात. 

स्वच्छतेशी संबंधित आवश्यक सामान...

आपत्कालिन किटमध्ये साबण, हँड सॅनिटायजर, वेट वाइप्स, टिश्यू पेपर, सॅनिटरी उत्पादन, कचऱ्याच्या पिशव्या आणि जंतुनाशक हाताशी ठेवा. मान्सूनदरम्यान ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे संक्रमण आणि आजारांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अशात स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. 

पावसात बचाव करण्यासाठी काय कराल?

छत्री, रेनकोट, वॉटरप्रुफ बॅग आणि अतिरिक्त कपडे अशा ठिकाणी ठेवा, जिथं आवश्यकता निर्माण झाल्यास लगेच मिळतील. मुसळधार पावसात मोबाइल फोन, अन्य इलेट्रॉनिक सामान सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रुफ कव्हरचा वापर करणं चांगला पर्याय आहे. 


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com