Spider Bite Treatment: पावसाळ्यात कोळ्यांचा प्रादुर्भाव अनेकदा वाढतो. कोळी चावल्यास वेदना होणे, खाज येणे, लालसरपणा किंवा हलकी सूज यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बहुतेक लोक कोळ्यांना पाहून घाबरतात आणि योग्य माहितीशिवाय स्वतःच उपचार करतात, पण असे करणे योग्य मानले जात नाही. याच विषयावर प्रसिद्ध डॉ. जेम्स ओ'डोनोवन यांनी सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर करून कोळी चावल्यास काय करावे आणि काय करू नये? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
पाहा व्हिडीओ
कोळी चावल्याचे निशाण कसे दिसते?
- छोटे डाग
- पुरळ येणे
- जळजळ होणे
- खाज सुटणे
- सूज येणे
कोळी चावल्यास त्वचेवर काय लावावे?
- सर्वात आधी बाधित जागा स्वच्छ करा
- जर तुम्हाला कोळी चावला असेल तर सर्वात आधी तो भाग स्वच्छ पाण्याने आणि सौम्य साबणाने धुऊन घ्यावा.
- यामुळे संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो आणि त्वचा स्वच्छ राहते.
बर्फाने शेक द्यावा
कोळी चावलेल्या ठिकाणी वेदना, सूज किंवा जळजळ जाणवत असेल तर स्वच्छ कापडात बर्फ गुंडाळून 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने शेक द्यावा. लक्षात ठेवा की बर्फ थेट त्वचेवर लावू नका, कारण यामुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकते.
(नक्की वाचा: Banana FAQs: 30 दिवस रोज केळ खाल्ल्यास काय होईल? 1 दिवसात किती केळी खावी? महागडे केळ कुठे पिकते? 10 FAQs)
त्वचा खाजवणे टाळा
कोळी चावल्यानंतर खाज येणे सामान्य आहे, पण वारंवार खाजवल्याने त्वचा सोलवटू शकते आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. शक्यतो त्या जागेला हात लावू नका.
(नक्की वाचा: High Cholesterol Symptoms: ब्लड रिपोर्टमध्ये हाय कोलेस्टेरॉल वाढल्यानं टेन्शन आलंय? HDL, LDL, VLDL किती असावं?)
डॉक्टरांकडे कधी जावे?
जर कोळी चावल्यानंतर यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, त्वरित रुग्णालयात जा:
- श्वास घेण्यास त्रास होणे
- चेहरा, ओठ किंवा घशात सूज येणे
- तीव्र ताप किंवा थंडी वाजणे
- संपूर्ण शरीरावर पुरळ किंवा अॅलर्जी होणे
- चावलेल्या ठिकाणी तीव्र वेदना किंवा पू होणे
- उलटी, चक्कर येणे किंवा बेशुद्ध झाल्यासारखे वाटणे
(जेम्स एक प्रशिक्षित डॉक्टर आहेत. त्यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले आहे, पण आज ते अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. ते एका जागतिक आरोग्य संघटनेत संशोधन संचालक आहेत, न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये सहाय्यक क्लिनिकल प्रोफेसर आहेत, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) तांत्रिक सल्लागार आहेत आणि NHS मध्ये परवानाधारक डॉक्टर म्हणूनही काम करतात.)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world