जाहिरात

High Cholesterol Symptoms: ब्लड रिपोर्टमध्ये हाय कोलेस्टेरॉल वाढल्यानं टेन्शन आलंय? HDL, LDL, VLDL किती असावं?

ब्लड रिपोर्टमध्ये बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यास घाबरण्याची गरज नाही. तुमच्या हृदयाच्या आरोग्याची खरी स्थिती दर्शवणारा कोलेस्टेरॉल रेशो कसा काढायचा आणि HDL, LDL व VLDL चे शरीरातील योग्य प्रमाण किती असावे, याबद्दल सविस्तर माहिती.

High Cholesterol Symptoms: ब्लड रिपोर्टमध्ये हाय कोलेस्टेरॉल वाढल्यानं टेन्शन आलंय? HDL, LDL, VLDL किती असावं?
"Bad Cholesterol Levels In Blood Report: शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी किती असते?"
Canva

High Cholesterol Symptoms: ब्लड रिपोर्टमध्ये (Blood Report) LDL (Bad Cholesterol) वाढलेले पाहून अनेक लोक घाबरून जातात, पण हृदयाच्या आरोग्याची स्थिती समजून घेण्यासाठी केवळ एकाच आकड्यावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. शरीरात HDL (गुड कोलेस्ट्रॉल), LDL आणि VLDL या तीनही गोष्टींची स्वतःची वेगवेगळी भूमिका असते. जिथे HDL हृदयाचे रक्षण करण्यास मदत करते, तिथेच LDL आणि VLDL चे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्याचा धोका वाढू शकतो. चला तर मग, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया कोलेस्टेरॉलबाबतची संपूर्ण माहिती...

कोलेस्टेरॉल रेशो म्हणजे काय?

कोलेस्टेरॉल रेशो हा असा एक आकडा आहे, जो तुमच्या हृदयाचे आरोग्य कसे आहे हे सांगण्यास मदत करतो. हा रेशो काढण्यासाठी तुमच्या एकूण कोलेस्ट्रॉलला (Total Cholesterol) HDL म्हणजेच गुड कोलेस्टेरॉलने भागले जाते.

सूत्र (Formulla): कोलेस्टेरॉल रेशो = एकूण कोलेस्टेरॉल ÷ HDL (गुड कोलेस्टेरॉल)

हा रेशो यासाठी महत्त्वाचा आहे कारण HDL हृदयाचे रक्षण करण्याचे काम करते. शरीरात जितके जास्त चांगले कोलेस्टेरॉल असेल, तितके ते हृदयासाठी अधिक चांगले मानले जाते.

जर तुमचा कोलेस्टेरॉल रेशो 3.5:1 पेक्षा जास्त असेल, तर हे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढण्याचे संकेत असू शकतात. अशा परिस्थितीत खाण्यापिण्यावर आणि जीवनशैलीवर (Lifestyle) विशेष लक्ष देणे गरजेचे ठरते.

(नक्की वाचा: IVF Failure Causes: IVF प्रक्रियेत 3 वेळा अपयश आले? पुन्हा प्रयत्न करावा की थांबावे? डॉ तांबेंनी दिली मोठी माहिती)

कोलेस्टेरॉल रेशो कसा काढावा?

समजा तुमच्या ब्लड रिपोर्टमध्ये:

एकूण कोलेस्टेरॉल = 200 mg/dL

HDL (गुड कोलेस्टेरॉल) = 50 mg/dL

तर तुमचा रेशो पुढीलप्रमाणे असेल: 200 ÷ 50 = 4

म्हणजेच तुमचा कोलेस्टेरॉल रेशो 4:1 असा आहे.

  • HDL, LDL आणि VLDL चे प्रमाण किती असावे?
  • HDL (गुड कोलेस्टेरॉल): एकूण कोलेस्टेरॉलच्या 20-30% असावे.
  • LDL (बॅड कोलेस्टेरॉल): एकूण कोलेस्टेरॉलच्या 60-70% पर्यंत असू शकते.
  • VLDL: हे LDL तयार होण्यापूर्वीचे रूप असते आणि एकूण कोलेस्टेरॉलच्या साधारणतः 10-15% असते.

(नक्की वाचा: Monsoon UTI: पावसाळ्यात मूत्रमार्गाच्या समस्या का वाढतात? डॉ. वसल यांच्याकडून जाणून घ्या कारणं आणि लक्षणं)

किती कोलेस्टेरॉल रेशो चांगला मानला जातो?

कोलेस्टेरॉल रेशो पाहून हृदयाच्या आरोग्याचा अंदाज लावला जाऊ शकतो:

  • 3.5 पेक्षा कमी: सर्वोत्तम (उत्कृष्ट)
  • जवळपास 4: चांगला
  • 5 पेक्षा जास्त: हृदयाच्या आजारांचा धोका वाढलेला
  • 6 पेक्षा जास्त: अतिशय जास्त धोका (जोखीम)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com