Monsoon Helth Tips: पावसाळा सुरु झाला की साथीच्या रोगांना सुरुवात होते, मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. बाहेरचे खाल्ल्याने पोट बिघडू शकते आणि बाहेरचे पाणी प्यायल्यानेही पोट बिघडू शकते. म्हणूनच या ऋतूत काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी लोक अनेकदा दोनदा विचार करतात. अशावेळी पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी आपण कोणते पाणी प्यावे? आरओ (RO) की उकळलेले? हा प्रश्न तुमच्या मनातही येतो का? जाणून घ्या याचे नेमके उत्तर..
RO की उकळलेले पाणी, पावसाळ्यात काय योग्य..?
डॉ. जयेश त्रिवेदी, इंटर्नल मेडिसिन स्पेशालिस्ट, उदयपूर, एमबीबीएस, एमडी इंटर्नल मेडिसिन, यांच्या मते, आरओ (RO) पाण्यात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता असते. हे पाणी विषाणू आणि जीवाणूंना पूर्णपणे नष्ट करतेच असे नाही. त्यामुळे, या ऋतूत उकळलेले पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकते.
पाण्यामुळे होणारे आजार कोणते?
डॉक्टरांनी सांगितले की, उकळलेले पाणी प्यायल्याने अतिसार, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, हिपॅटायटीस आणि आव यांसारख्या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून तुमच्या शरीराचे संरक्षण होण्यास मदत होते. पाण्याचा प्रकार कोणताही असो, उकळलेले पाणी पिणे फायदेशीर मानले जाते.
उकळलेले पाणी पिण्याचे फायदे?
- उकळलेले पाणी प्यायल्याने पोटाचे विकार कमी होतात.
- उकळलेले पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
- हे पाणी त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासही मदत करते.
डॉ. जयेश त्रिवेदी हे उदयपूरमधील इंटर्नल मेडिसिन तज्ञ असून त्यांना ४५ वर्षांचा अनुभव आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world