Vitamin B12 Deficieny: प्रत्येकाच्या किचनमध्ये कित्येक चविष्ट खाद्यापदार्थांसह आरोग्यवर्धक गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टींचे तुम्ही योग्य पद्धतीने सेवन केले तर शरीरातील कित्येक पोषणतत्त्वांच्या कमतरता भरुन निघण्यास मदत मिळेल. या लेखाच्या माध्यमातून आपण अशा एका डाळीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये व्हिटॅमिन B12चा खजिना आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मूग डाळ असते, मूग डाळीपासून गोड-तिखट पदार्थ तयार केले जातात. डाळ, खिचडी, खीर काही लोक तर भाज्यांमध्येही मूग डाळीचा (Moong Dal Benefits) समावेश करतात. पण कित्येकांना डाळीचे फायदे माहितीच नाहीयेत.
व्हिटॅमिन बी12 हे एक असे तत्त्व आहे, जे डीएनएकरिता आणि पेशींना शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया, थकवा आणि कमकुवतपणा यासारख्या समस्या निर्माण होतात. शरीरातील व्हिटॅमिन बी12ची कमतरता दूर करण्यासाठी काही लोक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधांसह डाएटमध्ये व्हिटॅमिन बी12युक्त पदार्थांचा समावेश करू शकतात.
(नक्की वाचा: Vitamin B12 Remedy: शरीरात 200च्या स्पीडने वाढेल व्हिटॅमिन B12,करा हा उपाय)
व्हिटॅमिन बी12ची कमतरता कशी भरुन काढावी?
व्हिटॅमिन बी12ची कमतरता भरुन काढण्यासाठी डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. व्हिटॅमिन बी12 अधिकतर मांसाहारी पदार्थांमध्ये असते. पण मूग डाळीमध्येही व्हिटॅमिन बी12चे प्रमाण जास्त आहे.
(नक्की वाचा: शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, शाकाहाऱ्यांसाठी ठरेल रामबाण)
मूग डाळीचे कसे करावे सेवन?
रात्री झोपण्यापूर्वी कपभर मूग डाळ योग्य पद्धतीने स्वच्छ करुन धुऊन घ्यावी आणि पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर भिजवलेल्या डाळीचे पाणी प्यावे. भिजवलेल्या डाळीमध्ये कांदा, लिंबू मिक्स करुन त्याचेही सेवन करू शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)