
Srishti Dabas IAS Success Story: यूपीएससी (UPSC Exam) परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. काही उमेदवारांना ती उत्तीर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात, तर काहींना ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होते. बहुतेक उमेदवार यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंगवर अवलंबून असतात. मात्र वर्दीतील सौंदर्यवती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएएस सृष्टी दबास यांनी यूपीएससी कोचिंगशिवाय आणि पूर्णवेळ नोकरी करताना यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. जाणून घेऊया सृष्टी डबास यांची सक्सेस स्टोरी..
जन्मताच ती नकोशी झाली
एकट्या आईच्याच छायेखाली वाढलेल्या सृष्टी डबास यांचा जन्म १ ऑक्टोबर १९९८ रोजी राणी खेडा गावात झाला. तिच्या जन्माचा कोणताही उत्सव झाला नाही. मुलगी झाल्यामुळे घरामध्ये मोठा कलह निर्माण झाला. काही काळानंतर तिचे पालक वेगळे झाले. त्यानंतर तिच्या आईने तिला एकट्याने वाढवले. तिच्या आईचा संघर्ष पाहून, सृष्टीने तिच्या आईचे जीवन सोपे करण्याचा निर्णय घेतला.
सीबीएसई परीक्षेत अव्वल| CBSE Exam Topper
सृष्टी डबास यांची शैक्षणिक कामगिरी खूप काही सांगून जाते. त्यांनी दिल्लीतील गंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. २०१६-१७ च्या सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेत ९६.३३% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर त्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्रात बीए आणि इग्नूमधून राज्यशास्त्रात एमए केले. एक हुशार शिक्षणतज्ज्ञ असण्यासोबतच, सृष्टी एक कुशल कथक नृत्यांगना देखील आहे.
रिझर्व बँकेत काम, लंच टाईमध्ये अभ्यास
रिझर्व्ह बँकेत पूर्णवेळ नोकरी करताना यूपीएससीची तयारी करणे सोपे नव्हते. पण डबास यांनी वेळेचा पुरेपूर वापर केला. जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा त्या आरबीआय लायब्ररीत अभ्यास करण्यासाठी जायच्या. एवढेच नाही तर जेवणाच्या वेळी नोट्स लिहायची किंवा उजळणी करायची. त्यांचे संपूर्ण लक्ष आयएएस अधिकारी होण्याच्या तिच्या ध्येयावर होते. सृष्टी यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की प्रवास खूप आव्हानात्मक होता, परंतु तिच्या समर्पणाने तिला सातत्याने प्रेरणा दिली आहे.
२०२३ मध्ये यूपीएससी टॉपर| 2023 UPSC TOPPER
सृष्टी डबास यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली आणि सहावा क्रमांक मिळवला. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत एकूण १०४८ गुण मिळवले, ज्यात लेखी परीक्षेत ८६२ आणि व्यक्तिमत्व चाचणीत १८६ गुण समाविष्ट आहेत. त्यांनी २०२४ च्या बॅचमधून आयएएसची वर्दी मिळवली. या पदावर पोहोचणे तिच्यासाठी सोपे नव्हते. तिच्या आईच्या त्यागामुळे आणि सृष्टीच्या कठोर परिश्रमामुळे तिचे स्वप्न पूर्ण झाले. सध्या त्या सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. त्यांचे फोटो पाहून Beauty With Brain अन् वर्दीतील सौंदर्यवती असंच म्हणावं लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world