Nag Panchami 2025: हिंदू धर्मात नागपंचमीच्या सणाला विशेष महत्त्व असते. साप किंवा सर्पाला आपल्या संस्कृतीत देव मानलं जातं. त्यांची पूजा केली तर कालसर्प दोष (Kaalsarp Dosh) दूर होतो. सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशसारखा त्रास दूर होतो. अशावेळी भाविक मनोभावे सापाची पूजा करतात. नागपंचमीला नाग देवतेसह (Nag Devta) भगवान शंकराची पूजा केली जाते. या दिवशी नाग देवतेचं दर्शन होणं शुभ मानलं जातं. यंदाच्या वर्षी कधी आहे नाग पंचमी आणि कोणत्या शुभ मुहुर्तावर नाग देवतेची पूजा केली जाऊ शकते.
नागपंचमी कधी आहे | Nag Panchami 2025 Date | Nag Panchami Kadhi aahe
पंचांगानुसार, श्रावण मासाच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी 28 जुलैच्या सकाळी 11 वाजून 24 मिनिटांवर सुरू होईल आणि या तिथीचा समापन 20 जुलैच्या रात्री 12 वाजून 46 मिनिटांवर होईल. उदया तिथी लक्षात घेता नागपंचमी 29 जुलै, मगंलवारी साजरी केली जाईल.
29 जुलैला नागपंचमीच्या पुजेसाठीचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 41 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 23 मिनिटांपर्यंत राहील. या शुभ मुहूर्तात विधिवत नागपंचमीची पूजा संपन्न केली जाईल.
नक्की वाचा - Shravan 2025 Date: श्रावण महिना कधीपासून सुरू होणार? श्रावणी सोमवार किती, शिवामूठीचे महत्त्व जाणून घ्या
नागपंचमीचा पूजा विधीनागपंचमीची पूजा करण्यासाठी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर, गाईच्या शेणाचा वापर करून साप बनवला जातो. नागदेवतेचे आवाहन केले जाते आणि ध्यान केला जातो. या दिवशी उपवास केला जातो. नाग देवतेला दूध देऊन पूजा केली जाते. नाग देवाच्या मंत्रांचा जप केला जातो. आणि पूजा (Nag Panchami Puja) करीत मनातील इच्छा मागितली जाते.
नागपंचमीच्या पुजेने कालसर्प दोष होतो दूर..
जेव्हा सूर्य, चंद्र आणि गुरुसह राहुची उपस्थिती कुंडलीमध्ये असते तेव्हा कालसर्प दोष होतो. मान्यतेनुसार राहुचा अधिदेवता काल आहे आणि केतुचा अधिदेवता सर्प आहे. जर कुंडलीत या दोन ग्रहांच्या मध्ये सर्व ग्रह एकाच बाजूला असतील तर कालसर्प दोष होतो. नागपंचमीची पूजा केल्याने कालसर्प दोष दूर होतो असे मानले जाते.