Sardar Patel Birth Anniversary 2025: लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Patel Jayanti 2025) यांची 150वी जयंती आहे. सरदार पटेल हे स्वातंत्र्य भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री होते. 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरात राज्यातील नडियाद शहरामध्ये त्यांचा जन्म झाला होता. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सरदार पटेल (Sardar Patel) यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. पेशाने वकील असलेल्या पटेल (National Unity Day 2025) यांनी 562 संस्थानांचे भारतामध्ये विलीनीकरण केले होते. भारताला एकसंध राष्ट्र बनवण्यामध्ये वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सरदार पटेल यांचे विचार आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणा आहेत. सरदार पटेल (Sardar Patel Birth Anniversary 2025) यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे काही प्रेरणादायी विचार (Sardar Patel Quotes) जाणून घेऊया...
सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रेरणादायी विचार (Sardar Vallabhbhai Patel Quotes)
1. "या मातीमध्ये काहीतरी वेगळे आहे, कित्येक अडथळे आल्यानंतरही जेथे नेहमीच महान आत्म्यांचे वास्तव्य राहिलंय".
2. "आज आपण उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, जाती-धर्म आणि पंथाचे भेदभाव संपवले पाहिजेत."
3. "शक्तीशिवाय श्रद्धा निरुपयोगी आहे. कोणतेही महान कार्य साध्य करण्यासाठी श्रद्धा आणि शक्ती दोन्ही आवश्यक आहेत."
4. "माणसाने शांत राहिले पाहिजे आणि रागावू नये. लोखंड गरम झाले तरी हातोडा थंड राहिला पाहिजे, अन्यथा तो स्वतःचा हात जाळून घेईल. कोणतेही राज्य जनतेवर कितीही गरम झाले तरी शेवटी शांतच व्हावे लागते".
5. "तुमचा चांगुलपणा तुमच्या मार्गातील अडथळा आहे, म्हणून तुमचे डोळे रागाने लाल होऊ द्या आणि अन्यायाचा मजबूत हातांनी सामना करा".
6. "अधिकार माणसाला तोपर्यंत अंध ठेवतील जोपर्यंत माणूस ते मिळवण्यासाठी किंमत मोजत नाही".
7. "तुम्हाला तुमचा अपमान सहन करण्याची कला आली पाहिजे".
8. "माझी एक इच्छा आहे की भारत एक चांगला उत्पादक देश व्हावा आणि या देशात कोणीही अन्नासाठी अश्रू गाळून उपाशी राहू नये".
9. "जेव्हा जनता एक होते तेव्हा त्यांच्यासमोर कोणतेही क्रूर शासन टिकत नाही, म्हणून जाती-पंथाचे उच्च-नीच भेदभाव विसरुन सर्वांनी एकत्र यावे".
10. "संस्कृती जाणूनबुजून शांततेवर रचण्यात आली. मरणारे त्यांच्या पापांमुळे मरतील. प्रेम आणि शांतीने केलेले काम द्वेषभावनेने करता येत नाही".
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world