कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव, 3 ते 12 ऑक्टोबरपर्यंत या विशेष कार्यक्रमांचे आयोजन

Navratri 2024: कोल्हापुरातील दसरा महोत्सवामध्ये यंदाही विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Advertisement
Read Time: 3 mins

Navratri 2024: कोल्हापूरमधील दसरा सणाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा सणाच्या दिवशी ऐतिहासिक पद्धतीने सीमोल्लंघन सोहळा पार पडेल. शाही दसऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील दसरा महोत्सवाला (Dasara Mahotsav in kolhapur) लोकांची मोठी गर्दी होते. यंदाच्या महोत्सवामध्ये काय विशेष असणार आहे? याची माहिती जाणून घेऊया...

कोल्हापुरामध्ये 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरदरम्यान विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. दसरा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. 

रणरागिणी ताराराणी यांनी स्वराज्याचे रक्षण करून आपली राजधानी 1709च्या दरम्यान पन्हाळगडावर स्थापन केली. पुढे 1788 सालापर्यंत पन्हाळगडावर दसरा साजरा केला जात होता. नंतरच्या काळात करवीर छत्रपतींची राजधानी कोल्हापूर करण्यात आली. तेव्हापासून दसरा कोल्हापुरात साजरा होऊ लागला. आजही येथे दसरा सण मोठ्या थाटमाटामध्ये साजरा केला जातो.  

(नक्की वाचा: Navratri 2024: औंधासुराचा वध करणारी साताऱ्यातील प्रसिद्ध श्री यमाई देवी)

दसरा महोत्सवामधील विविध कार्यक्रम |  Dasara in Kolhapur 2024 

3 ऑक्टोबर 2024: भवानी मंडप परिसर येथे संध्याकाळी 5 वाजता दसरा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. तसेच मेन राजाराम हायस्कूल येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ताक्षरीत दुर्मिळ पत्रसंग्रहाच्या प्रदर्शनाचे आणि ऐतिहासिक ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.  
4 ऑक्टोबर 2024: जिल्ह्यातील नागरिक, शाळा, महाविद्यालये आणि शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागातून पांरपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने फेटा बांधण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. 

(नक्की वाचा: Navratri 2024: हजारो फूट उंच टेकडीवरील मांढरदेवी काळुबाईच्या प्राचीन मंदिराचे हे आहे प्रमुख आकर्षण)

5 ऑक्टोबर 2024: शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरची वारसा संस्कृती आणइ सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन.
6 ऑक्टोबर 2024: भवानी मंडप परिसरात 'महाराष्ट्राची शक्तीपीठे' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. 
7 ऑक्टोबर 2024: भवानी मंडप परिसर येथे 10 पथकांची युद्धकला प्रात्यक्षिक सादरीकरण, संध्याकाळी 5 वाजता 'गौरव माय मराठीचा' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
8 ऑक्टोबर 2024: सकाळी 8 वाजता विविध क्षेत्रातील महिलांच्या 'नवदुर्गा बाईक रॅली'चे आयोजन.
9 ऑक्टोबर 2024: संध्याकाळी 5.30 वाजता भवानी मंडप परिसर येथे पोलीस कर्मचारी बॅड, मिलिटरी कर्मचारी बँड, शाळांचे आणि इतर नामवंत पथकांचे बँड वादन. 

(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)

10 ऑक्टोबर 2024: शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरची वारसा संस्कृती आणि सण परंपरा या विषयावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन.
11 ऑक्टोबर 2024: श्री अंबाबाई देवीच्या नगरप्रदक्षिणा मार्गावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन.
12 ऑक्टोबर 2024: संध्याकाळी 5 वाजता भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर दसऱ्यानिमित्त शाही स्वारीचे आयोजन. सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोलवादन पथके, लेझीम पथके, झांज पथक, शिवकालीन वेशभूषेमधील मावळे, मर्दानी खेळाची पथके, मल्लखांब पथके, 11 घोड्यांसह 11 मावळे, 10 मावळे-अब्दागिरींचा समावेश असेल. 

तसेच न्यू पॅलेस ते दसरा चौक या मार्गावरुन 150 बुलेटस्वार, पोलीस एस्कॉर्ट आणि छत्रपतींच्या घराण्यातील वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे.  

अशा पद्धतीने 3 ऑक्टोबरपासून ते 12 ऑक्टोबरपर्यंत दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

Navratri च्या खरेदीसाठी मुंबईतल्या भुलेश्वर मार्केटमध्ये काय आहे खास.. पाहा स्पेशल व्हिडीओ