
Navratri 2025 Day 3| Royal Blue Colour: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी (24 सप्टेंबर) चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. देवी मातेच्या कपाळावरील चंद्रकोरमुळे तिला चंद्रघंटा देवी म्हटले जाते. देवीमातेची कांती ही सोन्यासारखी असते, दशभुजा असणाऱ्या या मातेने प्रत्येक हातांमध्ये शस्त्र धारण केले आहेत. सिंह हे चंद्रघंटा मातेचे वाहन असते आणि या देवी मातेची मनोभावे पूजा केल्याने जीवनामध्ये सुख-समृद्धी शांतता नांदते, अशी श्रद्धा आहे.
देवीची तिसरी माळ, रंग आहे निळा
24 सप्टेंबर 2025 रोजी बुधवार असून नवरात्रौत्सवाची तिसरी माळ आहे. तिसऱ्या दिवशीचा शुभ रंग हा निळा असून, निळा रंग हा शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
अशी करा चंद्रघंटा मातेची पूजा ( Chandraghanta Devi Puja Vidhi)
- चंद्रघंटा मातेची पूजा करण्यासाठी पहाटे उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्रे परिधान करा.
- पूजेची जागा स्वच्छ करून घ्या आणि देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करा.
- देवीच्या मूर्तीला गंगाजलने स्नान घालावे.
- देवीसमोर धूप-दिवा प्रज्वलित करावे. फुलं अक्षता चंदनही अर्पण करावे.
- देवीला नैवेद्य अर्पण करुन तिची मनोभावे प्रार्थना करावी.
- यानंतर देवीची आराधना करण्यासाठी मंत्रांचा जप करावा
चंद्रघंटा देवीच्या आराधनेसाठी मंत्र (Maa Chandraghanta Mantra)
पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकेर्युता.
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
ध्यान मंत्र
वन्दे वांछित लाभाय चन्द्रार्धकृत शेखरम्.
सिंहारूढा चंद्रघंटा यशस्वनीम्॥
मणिपुर स्थितां तृतीय दुर्गा त्रिनेत्राम्.
खंग, गदा, त्रिशूल,चापशर,पदम कमण्डलु माला वराभीतकराम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालंकार भूषिताम्.
मंजीर हार केयूर,किंकिणि, रत्नकुण्डल मण्डिताम॥
प्रफुल्ल वंदना बिबाधारा कांत कपोलां तुगं कुचाम्.
कमनीयां लावाण्यां क्षीणकटि नितम्बनीम्॥
(नक्की वाचा: Navratri 2025 Colours And Their Significance: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून घ्या)
चंद्रघंटा मातेला कोणता नैवेद्य अर्पण करावा? (Chandraghanta Devi Bhog)
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची आराधना केली जाते आणि ती प्रसन्न व्हावी यासाठी दूध किंवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला चंद्रघंटा माता प्रसन्न व्हावी यासाठी खिरीचाही नैवेद्य दाखवला जातो. दूध किंवा दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी चंद्रघंटा भाविकांचे सर्व दुःख दूर करते, असे मानले जाते.
(नक्की वाचा: Navratri 2025 Fasting Rules: नवरात्रीचे व्रत कसे करावे? 9 दिवस काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम)
चंद्रघंटा मातेची कथा (Maa Chandraghanta Katha)
पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा राक्षस उन्मत्त झाला होता. त्याने इंद्रदेवाचे सिंहासनही बळकावले होते. त्याला स्वर्गावरही राज्य करायचे होते. यामुळे समस्त देव चिंतेत पडले होते. हे देव त्रिदेवांकडे अर्थातब्रह्मा, विष्णु आणि महेशाकडे गेले. महिषासुराबद्दल ऐकताच त्रिदेव संतापले. या क्रोधाग्नीत त्यांच्या मुखातून एक उर्जा बाहेर पडली त्यातून चंद्रघंटा मातेचा जन्म झाला. महिषासुराचा अंत करण्यासाठी भगवान शंकराने चंद्रघंटा मातेला त्रिशूळ दिलं आणि भगवान विष्णूने मातेला आपले सुदर्शन चक्र दिले. इतर देवतांनीही मातेला त्यांची अस्त्रे दिली. सोबतच इंद्रदेवाने मातेला घंटा दिली. या अस्त्रांच्या मदतीने चंद्रघंटा मातेने महिषासुराचा संहार केला आणि सर्व देवतांचे रक्षण केले.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world