Navratri 2025 Kanya Pujan: शारदीय नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन कसे करावे? विधी आणि महत्त्व वाचा

Navratri 2025 Kanya Pujan: नवरात्रौत्सवातील अष्टमी आणि नवमी तिथीला भाविक देवी सरस्वती, देवी लक्ष्मी आणि काली माता या दुर्गामातेच्या तीन प्रमुख स्वरुपांची पूजा करतात. त्यांच्या रुपाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कन्यांचे विशेष पूजन केले जाते. नवरात्रीमध्ये कन्या पूजा कशी करावी, जाणून घेऊया माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Navratri 2025 Kanya Pujan Date: शारदीय नवरात्रीमध्ये कन्या पूजन कधी आणि कसे करावे?"

Navratri 2025 Kanya Puja Vidhi: नवरात्रीतील अष्टमी तिथीला दुर्गा अष्टमी आणि नवमी तिथीला महानवमी असेही म्हणतात. या दिवशी दुर्गामातेच्या स्वरुपांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कन्यांचे विशेष पूजन करण्याची परंपरा आहे. महाअष्टमी किंवा महानवमीला देवी स्वरुप लहान मुलींना घर बोलवून त्यांची विधीवत पूजा केली जाते. ही पूजा केल्यास नवरात्रीच्या नऊ दिवसांचे पुण्यफळ प्राप्त होते, असेही म्हणतात. याच महत्त्वपूर्ण कारणामुळे देवीभक्त नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमी तिथीच्या पूजेची तयारी पूर्वीच करुन ठेवतात. कन्या पूजन कधी आहे आणि पूजा कशी करावी, याबाबत माहिती जाणून घेऊया. 

कन्या पूजन का केले जाते? (Navratri 2025 Kanya Puja Vidhi)

देवी भागवत पुराणानुसार असे मानले जाते की लहान मुली देवी दुर्गेचे अवतार असतात. या श्रद्धेनुसार भाविक नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांत नऊ मुलींचे पूजन करतात, त्यांना आदराने घरी आमंत्रित करतात. विधीवत लहान मुलींची पूजा करुन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो.  

(नक्की वाचा: Navratri 2025: गरबा खेळताना टाळी तीनदा का वाजवली जाते? काय आहे यामागील रहस्य)

कन्या पूजन कधी आहे आणि पूजा कशी करावी? (Navratri 2025 Ashtami And Navami Pujan)

  • नवरात्रौत्सवातील अष्टमी किंवा नवमी तिथीला स्वतःच्या घरी लहान मुलींना श्रद्धा आणि आदराने आमंत्रित करा.
  • देवीस्वरुप लहान मुलींची पूजा करावी. 
  • नवरात्रीची अष्टमी तिथी 30 सप्टेंबर 2025 आणि नवमी तिथी 1 ऑक्टोबर 2025 रोजी आहे.
  • नवरात्रीच्या या शेवटच्या दोन दिवसांत कन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षांच्या मुलींना घरी आमंत्रित करा.  
  • घरामध्ये लहान मुली आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय धुऊन कापडाने पुसावे. 
  • मुलींना आसनावर बसवून त्यांना हळदकुंकू अर्पण करावे. त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधावे.
  • यानंतर त्यांना हलवा पुरी, चणे, श्रीफळ आणि बताशे अशा गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण करा. 
  • कन्यांना कांदा-लसूणचा समावेश असलेल्या गोष्टी देऊ नये.  
  • पूजन आणि प्रसादानंतर लहान मुलींना स्वतःच्या क्षमतेनुसार धन,वस्त्र, फळं इत्यादी गोष्टी देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 

Advertisement

(नक्की वाचा: Navratri 2025 Colours And Their Significance: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून घ्या)

कंजक पूजेचे धार्मिक महत्त्व

  • कंजक पूजन नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला केले जाते. 
  • देवी स्वरुप मुलींचे विशेष पूजन केले जाते.
  • या पूजेत नऊ मुलींची पूजा करणे हे दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्यासारखे मानले जाते.

Photo Credit: Canva AI

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)