जाहिरात

Navratri 2025: गरबा खेळताना टाळी तीनदा का वाजवली जाते? काय आहे यामागील रहस्य

Navratri 2025| Garba Night Special: तीन टाळ्यांचा गरब्यामध्ये केवळ ताल नाहीय तर दुर्गामातेची शक्ती आणि त्रिदेवांचा संगम आहे. दांडिया आणि गरब्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...

Navratri 2025: गरबा खेळताना टाळी तीनदा का वाजवली जाते? काय आहे यामागील रहस्य
"Garba Three Claps Importance: गरबा खेळाचे महत्त्व"

Navratri 2025| Garba Night Special: नवरात्रौत्सव म्हणजे रंगीबेरंगी कपडे, सुंदर दागिने आणि संगीतावर खेळला जाणारा दांडिया-गरबा. नवरात्रीमधील या गोष्टी कोणालाही मोहित करतील, अशाच आहेत. पण गरब्यामध्ये टाळी तीनदा वाजण्यामागील परंपरा काय आहे? यामागील कारण तुम्हाला माहितीय का? गरबा हा केवळ नृत्यप्रकार नाहीय तर दुर्गामातेची भक्ती आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेली सुंदर कथा आहे. 

तीन टाळ्यांमागील आध्यात्मिक रहस्य (Three Claps Garba | Three Taali Garba)

गरब्यामध्ये तीन टाळ्या वाजवणे हा केवळ नृत्याचा भाग नाहीय. तर हे दुर्गामातेच्या रुपांच्या तीन गुणांचे प्रतीक मानले जाते. सत्व, रज आणि तम असे तीन गुण आहेत. तसेच याचा संबंध ब्रह्मा, श्रीविष्णू आणि महेश या तीन देवांच्या शक्तीशी असल्याचंही म्हटलं जातं. कथेनुसार महिषासूर राक्षसाच्या दहशतीमुळे देवता त्रासले होते, तेव्हा देवांनी दुर्गमातेला आवाहन केले होते. देवीने सलग नऊ दिवस युद्ध करुन महिषासूर राक्षसाचा वध केला. 

दुसरे म्हणजे नवरात्रौत्सवामध्ये कलेकलेने दुर्गादेवीचे मारक तत्त्व जागृत होत असतात. ब्रह्मा, श्रीविष्णु आणि महेश या ईश्वराच्या तीन प्रमुख कला आहेत. देवीचे मारक रूप जागृत होण्यासाठी तीन वेळा टाळ्या वाजवून गरबा खेळला जातोय, असेही म्हणतात.  

Navratri 2025 Colours And Their Significance: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून घ्या

(नक्की वाचा: Navratri 2025 Colours And Their Significance: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, प्रत्येक रंगाचे महत्त्व जाणून घ्या)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

परंपरेमध्ये दडलेला सांस्कृतिक संदेश  (Garba 3 Tali Meaning)

गुजरात राज्यासह देशभरात खेळला जाणारा गरबा केवळ मनोरंजनाचे रुप नाही तर पूजेचे स्वरुप आहे. दिव्याभोवती गोलाकार स्वरुपात गरबा खेळण्याची परंपरा आहे. पण मुंबईसह अन्य शहरामध्ये ही परंपरा हळूहळू लोप पावत चालल्याचं दिसतंय.  

Navratri 2025 Fasting Rules: नवरात्रीचे व्रत कसे करावे? 9 दिवस काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

(नक्की वाचा: Navratri 2025 Fasting Rules: नवरात्रीचे व्रत कसे करावे? 9 दिवस काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

दांडियाचे रहस्य (Why 3 claps in Garba)

दांडिया देखील केवळ एक खेळ नाहीय. तर दुर्गामातेने महिषासुराचा वध करण्यासाठी वापरलेल्या तलवारीशी याचा संबंध जोडला जातो. तर दुसरीकडे दांडियाचा संबंध भगवान श्रीकृष्ण यांच्या रासलीलेशी देखील जोडला जातो.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com