जाहिरात

Navratri 2025 Goddess By Zodiac Sign: तुमच्या राशीनुसार कोणत्या देवीची पूजा करणं ठरेल शुभ?

Navratri 2025 Goddess By Zodiac Sign: नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची मनोभावे उपासना केल्यास दुःख दूर होऊन आनंद-समृद्धी मिळते, असे म्हणतात. चैत्र, शारदीय आणि दोन गुप्त नवरात्रीमध्ये राशीनुसार कोणत्या देवीची पूजा करावी, जाणून घ्या माहिती...

Navratri 2025 Goddess By Zodiac Sign: तुमच्या राशीनुसार कोणत्या देवीची पूजा करणं ठरेल शुभ?
"Navratri 2025 Goddess By Zodiac Sign: तुमच्या राशीनुसार कोणत्या देवीची पूजा करणं फलदायी ठरेल?"

Navratri 2025 Goddess By Zodiac Sign: हिंदू धर्मामध्ये दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र सण अतिशय शुभ मानला जातो. म्हणूनच भाविक वर्षभर चैत्र, शारदीय आणि गुप्त नवरात्रौत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. या सणांदरम्यान देवीच्या विविध रुपांची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्राच्या नऊ दिवसांत दुर्गामातेच्या नऊ स्वरुपांची मनोभावे पूजा करुन आशीर्वाद मिळवला जातो. दरम्यान नवरात्रीमध्ये तुमच्या राशीनुसार देवीची पूजा केल्यास चांगले लाभ मिळतात, असे म्हणतात. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती... 

राशीनुसार कोणत्या देवीची पूजा करावी? | Navratri 2025 Goddess By Zodiac Sign

1. मेष रास 

शैलपुत्री मातेची उपासना करावी. पण जर तुम्हाला दहा महाविद्यांची साधना करायची असेल तर तारा देवीची पूजा करा.

2. वृषभ रास

वृषभ रास असणाऱ्या लोकांनी चैत्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी, तर गुप्त नवरात्रात षोडशी मातेची उपासना करावी.

3. मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी चंद्रघंटा मातेची पूजा करावी, गुप्त नवरात्रीमध्ये भुवनेश्वरी देवीची पूजा करावी. 

4. कर्क रास 

कर्क राशीच्या लोकांनी सिद्धिदात्री मातेची पूजा करावी, तर गुप्त नवरात्रीमध्ये कमलादेवीची उपासना करणे अधिक फलदायी ठरेल. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

5. सिंह रास 

सिंह राशीच्या लोकांनी चैत्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये कालरात्री देवीची आराधना करावी, तर गुप्त नवरात्रीमध्ये बगलामुखी देवीची विधीवत पूजा करावी. 

6. कन्या रास

देवीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी चंद्रघंटा मातेची पूजा करावी. तर गुप्त नवरात्रीमध्ये भुवनेश्वरी मातेची उपासना करावी. 

Navratri 2025 Kanya Pujan: शारदीय नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन कसे करावे? संपूर्ण विधी आणि महत्त्व वाचा

(नक्की वाचा : Navratri 2025 Kanya Pujan: शारदीय नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन कसे करावे? संपूर्ण विधी आणि महत्त्व वाचा)

7. तुळ रास

ब्रह्मचारिणी मातेची पूजा करावी, गुप्त नवरात्रीमध्ये षोडशी देवीची उपासना करावी.

8. वृश्विक रास

वृश्चिक राशीच्या लोकांनी शारदीय नवरात्रीमध्ये शैलपुत्री मातेची पूजा करावी आणि गुप्त नवरात्रीमध्ये तारा मातेची पूजा केल्यास विशेष फळ मिळेल.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

9. धनु रास

चैत्र आणि शारदीय नवरात्रीत सिद्धिदात्री देवीची पूजा करणं अत्यंत शुभ-फलदायी ठरेल. गुप्त नवरात्रीमध्ये कमला देवीची उपासना करावी. 

10. मकर रास

मकर राशीने नवरात्रीमध्ये सिद्धिदात्री मातेची पूजा करावी, गुप्त नवरात्रीमध्ये देवी दुर्गेची पूजा करावी. तसेच काली मातेची विशेष पूजा करावी. 

11. कुंभ रास

शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये सिद्धिदात्री देवीची विशेष पूजा करावी. तर गुप्त नवरात्रीमध्ये काली मातेची पूजा करणे फलदायी ठरेल. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

12. मीन रास

मीन राशीच्या लोकांनी शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये सिद्धिदात्री देवीची विशेष स्वरुपात साधना करावी. गुप्त नवरात्रीमध्ये कमला मातेची पूजा करणे शुभ ठरेल. 

Navratri 2025: गरबा खेळताना टाळी तीनदा का वाजवली जाते? काय आहे यामागील रहस्य

(नक्की वाचा: Navratri 2025: गरबा खेळताना टाळी तीनदा का वाजवली जाते? काय आहे यामागील रहस्य)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com