जाहिरात

NDTV Marathi Conclave: निरोगी राहायचं असेल तर काय करावे? आरोग्यतज्ज्ञांनी दिली आरोग्याची गुरुकिल्ली

ndtv marathi manch conclave: डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि डॉ. विजय सुरवसे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. एनडीटीव्ही मराठी मंचावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

NDTV Marathi Conclave: निरोगी राहायचं असेल तर काय करावे? आरोग्यतज्ज्ञांनी दिली आरोग्याची गुरुकिल्ली

मुंबई: बदलत्या हवामानानुसार, काळानुसार विविध आजार आपलं डोकं वर काढू लागतात. अलिकडच्या काळात हृदयविकाराचे धोकेही वाढत आहेत.. अशा परीस्थितीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी? आपला आहार कसा असावा याबाबत डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि डॉ. विजय सुरवसे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. एनडीटीव्ही मराठी मंचावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डॉ. जगन्नाथ दीक्षित काय म्हणाले?

मुळामध्ये कोणतंही डाएट हे एक शॉर्टटर्म गोष्ट आहे. लग्न ठरलंय आणि पाच किलो वजन कमी करायचंय म्हणून काही तरी करायचं. मी जे सांगतोय ती एक जीवनशैली आहे, जीवनशैली फॉलो करायला पाहिजे. डाएट हे टेम्पररी आहे.  कोणाचं डाएट फॉलो करायचे हा जो तुमचा प्रश्न आहे तर डाएट सांगणारा माणूस कोण आहे, हे पाहा. त्या सांगणाऱ्या माणसाचा काही हेतू आहे का? म्हणजे अमूक ठिकाणी भेट द्या आणि पैसा भरा. 

दुसरीकडे एखाद्या माणसाचं शिक्षण काय आहे, हे तपासून पाहा. हल्ली कोणीही काहीही सांगत असतं. तर यावरून तुम्ही एखाद्या माणसावर विश्वास ठेवायचं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शक्य असेल तर त्यांनी सांगितलेला उपाय फॉलो करून पाहा. तुम्हाला आलेला अनुभव चांगला आहे की वाईट?  त्यानुसार विश्वास ठेवा.  भरपूर खाणे आणि व्यायाम न करणे हा आपल्या जीवनशैलीमध्ये झालेला बदल आहे. मी फळांबाबत फारसा सकारात्मक नाहीय. कारण फळांमध्ये फ्रुक्टोज असते. साध्या साखरेमध्ये निम्मं फ्रुक्टोज निम्मं ग्लुकोज असतं. फळांमध्येही वेगवेगळ्या प्रमाणात असते. फ्रुक्टोज हे ग्लुकोजपेक्षा सातपट वाईट आहे. त्यामुळे निरोगी व्यक्तीने एक-दोन फळे खायला हरकत नाही. पण मधुमेहाच्या माणसाने एकही फळ खाऊ नये. जेवताना केवळ लिंबू खाल्लेले चालेल. इन्सुलिन वाढल्याने कित्येक आजारांची लागण होते, ते कमी करण्यासाठी कोणतेही औषध नाहीय, ते कमी करण्यासाठी लाइफस्टाइल आहे आणि लाइफस्टाइलला कोणी स्पॉन्सर्स नसतो.

( नक्की वाचा : NDTV Marathi Manch: 'पहलगाममधील हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवा', RSS ची मोदी सरकारकडं मागणी )
वजन आणि चरबी वाढण्याच्या समस्येवर मी गेल्या १०-१२ वर्षांपासून उपाय सांगतोय की दीक्षित जीवनशैली फॉलो करा. दिवसातून दोनदा जेवा. आहारामध्ये प्रथिने वाढवा आणि कार्बोहायड्रेट्स कमी करा. गोड पदार्थ शक्यतो टाळा. मधुमेह असेल तर मुळीच खाऊ नका. यासोबतच 250-300 कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळेल असा व्यायाम करा. हे जर तुम्ही फॉलो केले इन्सुलिनची पातळी कमी होईल. इन्सुलिन कमी झाले पोट कमी होईल. या गोष्टी तुम्ही सहा महिने फॉलो केल्या तर तुमच्या शरीराचे वजन सहा-साडेसहा किलो कमी होईल. फास्टिंग इन्सुलिन जितके जास्त तितके तुम्ही मधुमेह आजाराच्या जवळ आहात. 

6 पॅक-8 पॅक अ‍ॅब्स हे अनैसर्गिक आहे. 6 पॅक-8 पॅक कोणत्याही हीरोनं केलेले टिकलेले तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी विचित्र आहेत. त्यामुळे प्रोटीन पावडर-सप्लिमेंट चुकीच्या गोष्टी आहेत. समतोल आहार, चांगली झोप आणि पुरेसा व्यायाम या गोष्टी फॉलो केल्या तर सर्वजण निरोगी राहू शकतील.

NDTV Marathi Manch: 'राज्यातील तपासणी लॅबबाबत कडक कायदा..' आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी घोषणा

डॉ. विजय सुरवसेंनी दिला आरोग्याचा कानमंत्र!

अलिकडच्या काळामध्ये जीवनशैली बदलली आहे, यात काही शंकाच नाहीय. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसिजचे मुख्य कारण आहे जीवनशैली. 40-45 वर्षांपूर्वी पाश्चिमात्यकरण झाले आणि  40-45 वर्षांपूर्वी बहुतांश लोक 11-12 किलोमीटर चालायचे. पुरेश झोप घ्यायचा. आता सर्व मैदा, गहू, भाताचे सेवन करण्याचे प्रमाण वाढलंय. व्यायाम कमी आहे, फळांचे सेवन कमी आहे, प्रथिनांचे सेवन कमी आहे तर हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग होण्यामागील ही प्रमुख कारणे आहेत.

हृदय व रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांमध्ये पॅरालिसीस, किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, गँगरीन होणे यांचा समावेश आहे. संपूर्ण संस्थेवर हल्ला करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे बदलती जीवनशैली. त्यामुळे जीवनशैलीमध्ये बदल करायला हवा.  बाजरी, प्रथिने, फळांचे-भाज्यांचे जास्त प्रमाणात सेवन करायला हवे. आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्या काहीही गरज नाही ऑस्ट्रेलियन कीवी खाण्याची किंवा न्युझीलँडचे एखादे फळं खायचे. सर्वसाधारण फळे जी आपल्याकडे उपलब्ध आहेत ती खावीत. पाणी जा..

(नक्की वाचा- 'कोणासाठीही पॉलिटिकल स्पेस..', CM फडणवीसांच्या विधानाने विरोधकांची धाकधुक वाढणार!)