आंघोळी हा नित्याचीच बाब आहे. रोज सकाळी आंघोळ करून अनेक जण आपल्या दिवसाची सुरूवात करतात. पण काही जण सकाळी आंघोळ करणे टाळतात. त्या ऐवजी ते सर्व कामं झाल्यानंतर संध्याकाळी आंघोळी करणं पसतं करतात अशा वेळी आंघोळी करण्याची योग्य वेळ कोणती असा प्रश्न निर्माण होतो. शिवाय कोणत्या वेळी आंघोळ केल्यानंतर आरोग्याला ही त्याचा फायदा होतो अशी ही विचारणा होत आहे. त्यामुळे आपण कोणत्या वेळी आंघोळ करणं चागलं हे जाणून घेणार आहोत.
सध्या उकाड्याने सर्वांनाच हैराण केले आहे. अशा स्थितीत लोक दिवसातून दोन वेळा आंघोळ करणं पसंत करतात. उष्णतेपासून आराम मिळावा हा त्यांचा उद्देश असतो. काही लोकांना सकाळी अंघोळ केल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. ती त्यांची एक सवय बनली असते. तर काही जण रात्री अंघोळ करून शांत झोपणे पसंत करतात. अशा परिस्थितीत, सकाळी अंघोळ करावी की रात्री, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर रंजक आहे. तेच उत्तर आपण आता जाणून घेणार आहोत.
विज्ञानाच्या मते दोन्ही वेळेच्या आंघोळीचे शरीरावर वेगवेगळे आणि सकारात्मक परिणाम होतात. सकाळी किंवा रात्री यापैकी कोणती वेळ सर्वोत्तम आहे, असा कोणताही ठोस निष्कर्ष संशोधनातून समोर आलेला नाही. मात्र, दोन्ही वेळेचा शरीरावर आणि मानसिकतेवर होणारा परिणाम वेगवेगळा असतो, हे सिद्ध झाले आहे. ही केवळ स्वच्छतेची गोष्ट नसून तुमची जीवनशैली आणि सवयींवर देखील अवलंबून असते. असं शास्त्र सांगतं. त्यामुळे दोन्ही वेळा आंघोळ केली तरी त्याचे फायदेच आहेत.
अनेक जण दिवसा कामाला जातात. काहींचे काम हे ऑफीसमध्ये असते तर काहींचे काम हे बाहेर फिरण्याचे असते. पण दोन्ही कामासाठी घराबाहेर हे पढावे लागते. त्यामुळे दिवसभर घराबाहेर फिरल्यामुळे शरीरावर धूळ, माती, घाम आणि प्रदूषण याचा परिणाम होतो. अशा स्थितीत अंघोळ न करता झोपल्यास ही घाण थेट अंथरुणापर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने रात्री अंघोळ करणे योग्य मानले जाते. त्यामुळे स्वच्छता पण होते आणि रात्री शांत झोप ही लागते.
रात्री कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे तापमान संतुलित होते असं सांगितलं जातं. आंघोळीनंतर तापमान हळूहळू कमी होते. त्याचा परिणाम मेंदूवर होतो. विश्रांतीचे संकेत ही त्यातून मिळतात. ज्यामुळे अनिद्रतेचा त्रास कमी होतो आणि शांत झोप लागते. रात्री अंघोळ करण्यासोबतच अंथरुणाची स्वच्छता राखणेही तेवढेत गरजेचे आहे. बेडशीट किंवा उशीचे कव्हर नियमित स्वच्छ न केल्यास त्यावर बॅक्टेरिया जमा होतात. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेसोबतच बेडची स्वच्छताही महत्त्वाची आहे. सकाळची अंघोळ शरीराला आणि मनाला त्वरित ऊर्जा देते. कोमट किंवा थंड पाण्याने अंघोळ केल्याने आळस दूर होतो. या शिवाय रक्ताभिसरण सुधारते. माणूस दिवसभराच्या कामासाठी अधिक सक्रिय होतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world