- स्टँड अप कॉमेडी कलाकार मधुर विर्लीने बलात्कारासारख्या संवेदनशिल विषयावर विनोद केला आहे
- २०२४ मधील ‘लव्ह अँड लॅटेक्स’ शोतील हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे
- बलात्काराच्या या कमेंटवर उपस्थितांनी ही हसून आणि टाळ्या वाजवून लाज काढली आहे
स्टँड अप कॉमेडी करतात की स्वत:ची लाज काढून घेतात अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. प्रणित मोरेचे प्रकरण ताज आहे. असं असताना आता आणखी एक स्टँड अप कॉमेडीची व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मधुर विर्लीचा आहे. याने तर सर्व मर्यादाच ओलांडल्या आहेत. या जोकरेन तर जोक करण्याच्या नादात बलात्कारासारख्या संवेदनशिल विषयाचाच जोक केला आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
स्टँड अप कॉमेडीयन मधुर विर्ली याचा हा जुना व्हिडीओ आहे. 2024 मधील ‘लव्ह अँड लॅटेक्स' या शोमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रणित मोरे प्रकरणानंतर या व्हिडीओकडे नेटकऱ्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. या व्हिडीओत मधुर बलात्कारा सारख्या संवेदनशिल गोष्टीची थट्टा करताना दिसत आहे. तो सांगतो की 10 पैकी 9 प्रकरणांमध्ये बलात्कार होतो. तर एका प्रकरणात बलात्कारानंतर हत्या होते. ती का होते अशी विचारणा तो उपस्थिताना करतो.
त्यानंतर त्याचे उत्तर तो स्वत:च देतो. तो सांगतो की बलात्कारानंतर तो तरूण ज्यावेळी बाजूला होतो, त्यावेळी ती तरुणी म्हणते झालं, आता तु मला जवळ घेणार नाहीस. हे बोलल्यावर त्याने केलेले हावभाव आणि त्याची डायलॉग डिलिव्हरी यावर तिथे असलेले उपस्थितीत ही खीखी करून हसत असताना दिसत आहे. बलात्कार ही काही चेष्ठीची गोष्ट नाही. त्यातून संपूर्ण आयुश्य बर्बाद होतं. पण हे स्टँड अप कॉमेडीयन महाशय मधुर विर्ली त्याचा जोक करत आहे. आणि त्याहून अतिशहाणे असलेले तिथले प्रेक्षक त्यावर हसून आणि टाळ्या वाजवून दाद देत आहेत. त्यामुळे ही स्टँड अप कॉमेडी कोणत्या दिशेने चालली आहे असा प्रश्न पडत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मधुर विर्ली हा महाशय हादरून गेला आहे. त्याने भीतीने आपले सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केल्याचे समजत आहे. मात्र त्याने ज्या गंभीर गोष्टीवर विनोद केला तो विनोद नाही तर विकृती आहे अशा प्रतिक्रीया आता सोशल मीडियावर येत आहे. एका संवेदनशिल विषयाची ही क्रुर थट्टा असल्याचं ही काहींनी म्हटलं आहे. अशा व्हायात स्टँड अप कॉमेडी शो वर तातडीने बंदी घातली पाहीजे अशी मागणी ही काही जण करत आहेत.
What would you call a country where a RAPE happens EVERY 16 MINUTES EVERYDAY and MEN JOKE ABOUT RAPE and MURDER of WOMEN and the AUDIENCE LAUGHS ABOUT IT?
— The Protagonist (@protagonist_xig) June 12, 2026
A PRO RAPE country. pic.twitter.com/4VJGlRGRZN
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world