जाहिरात

Weight Loss Journey: न्युट्रिशनिस्टने डाएटशिवाय 30 Kg वजन घटवलं, फॉलो केल्या 14 सवयी! वाचा वेटलॉसचं सीक्रेट

Weight Loss Journey: न्युट्रिशनिस्ट नुपूर पाटीलने कोणत्याही कडक डाएटशिवाय 30 किलो वजन कसे कमी केले, याच्या 14 सोप्या टिप्स इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

Weight Loss Journey: न्युट्रिशनिस्टने डाएटशिवाय 30 Kg वजन घटवलं, फॉलो केल्या 14 सवयी! वाचा वेटलॉसचं सीक्रेट
"Weight Loss Tips: न्युट्रिशनिस्ट नुपूर पाटील कसे वजन केले कमी?"
Nupur Patil Instagrm

Weight Loss Journey: लठ्ठपणा ही आजच्या काळातील एक मोठी समस्या बनली आहे. धकाधकीचे आयुष्य आणि खराब लाइफस्टाइल यामुळे लठ्ठपणाची समस्या मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत पाहायला मिळत आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण काय काय प्रयत्न करतात. जिममध्ये तास-न्-तास घाम गाळणे, कडक डाएट फॉलो करणे आणि महागड्या सप्लिमेंट्स ट्राय करणे, पण हे सर्व उपाय केल्यानंतरही वजन कमी होण्याचे नाव घेत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, कोणत्याही कडक डाएटशिवायही वजन कमी केले जाऊ शकते? होय, तुम्ही बरोबर ऐकले. प्रसिद्ध सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट नुपूर पाटीलने इन्स्टाग्रामवर वेटलॉस जर्नीची पोस्ट शेअर केली आहे.

दुबई आणि मुंबईत राहणारी नुपूर पाटील सध्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण वजन कमी करणाऱ्यांसाठी तिची कहाणी प्रेरणादायी ठरतेय.

नुपूर पाटीलने या 14 सवयी केल्या फॉलो | Weight Loss Journey 

नुपूर पाटीलने वेटलॉस जर्नीतील 14 महत्त्वाच्या आणि सोप्या सवयी शेअर केल्या. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

1. एकाच पद्धतीचे खाद्यपदार्थांचे सेवन 
नुपूर पाटीलने सांगितले की, एकाच पद्धतीचे खाद्यपदार्थ वारंवार खाण्यास कंटाळा केला नाही. क्रीएटिव्हीटीपेक्षा सातत्य अधिक मौल्यवान आहे. एकच प्रकारचे जेवण खाल्ल्याने तुम्हाला जेवणातून मनोरंजन शोधण्याऐवजी स्वतःला बोर होऊ देण्याची संधी मिळते, ज्यामुळे अनावश्यक कॅलरीजचे सेवन कमी होते.

2. 'नो थँक्स'
खाद्यपदार्थाचा 'फक्त एक घास' म्हणत अतिरिक्त खाण्याऐवजी नो थँक्स असे म्हणणं योग्य समजल्याचं नुपूर पाटीलने सांगितले.

3. लवकर झोपणे
फोन स्क्रोलिंग किंवा स्नॅकिंग करण्याऐवजी लवकर झोपणे. झोप केवळ तुमच्या शरीराला आराम देत नाही, तर झोपेमुळे हार्मोनल संतुलन राखण्यास आणि मेटाबॉलिज्म (चयापचय क्रिया) वाढवण्यासही मदत करते.

4. रोज भरपूर चालणे
 नुपूरने रोज भरपूर चालण्यावर भर दिला, हा व्यायाम वजन कमी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय  मानला जातो.

5. भूक लागण्यापूर्वी पाणी पिणे
नुपूर पाटीलने सांगितले की, भूक जाणवण्यापूर्वी ती पाणी प्यायची. पाणी केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवत नाही, तर ते तुमचे पोट भरलेले ठेवण्यास आणि अनावश्यक कॅलरीजचे सेवन कमी करण्यासही मदत करते.

6. संथ प्रगती स्वीकारणे  
झटपट परिणाम मिळवण्याऐवजी तिने स्लो प्रोग्रेसचा स्वीकार केला. 

7. खराब दिवसांमध्येही टिकून राहणे
खराब दिवसांमध्येही आपल्या रूटीनवर टिकून राहिले आणि कमीत कमी काम करण्यावर भर दिल्याचे नुपूरने सांगितले.

8. साधेसोपे वर्कआउट 
साध्या सोप्या पद्धतीचे वर्कआउटच फॉलो केले. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळाली. 

(नक्की वाचा : ना जिम, ना डाएट; खरंच अजगराच्या रक्ताने लठ्ठपणा कमी होणार? शास्त्रज्ञांच्या हाती लागलं वेटलॉसचं मोठं सीक्रेट)

9. रोज स्वतःशी न बोलणे 
नुपूर पाटीलने सांगितले की, रोज स्वतःशी उलटसुलट चर्चा किंवा अतिरिक्त विचार केला नाही. जे नियमित फिटनेस रूटीनप्रती असलेले तिचे समर्पण दर्शवते.

10. ट्रिगर फुड घरात न ठेवणे 
नुपूर पाटीलचे मानणे आहे की, जे डोळ्यांपासून दूर असते ते तोंडापासूनही दूर राहते. जंक फुड, मिठाई किंवा गोड पेये तिनं घरामध्ये ठेवले नाहीत.

11. घरगुती खाद्यपदार्थ 
घरगुती खाद्यपदार्थ खाण्यावर नुपूरने भर दिला. 

12. प्रोटीनला प्राधान्य
जेव्हा जेव्हा कार्ब्स खाण्याची इच्छा व्हायची, तेव्हा नुपूरने प्रोटीनला प्राधान्य द्यायच्या. प्रोटीन केवळ तुम्हाला दीर्घकाळापर्यंत तृप्त (पोट भरलेले) ठेवत नाही, तर ते स्नायू बळकट करण्यास आणि शरीराचे मेटाबॉलिज्म वाढवण्यासही मदत करते.

13. सिम्पल दिसणे
जेव्हा इतर सर्व लोक ट्रेंड्सच्या मागे धावत असतात, तेव्हा साधे दिसण्यात समाधानी राहणे.

(नक्की वाचा : Health News: बाहेरचं खाऊन पोट बिघडलंय? सलग 15 दिवस खा ही घरातली 1 गोष्ट! हाडे, त्वचेलाही मिळतील जबरदस्त फायदे)

14. स्वतःशी तडजोड न करणे
नुपूर पाटीलने असेही सांगितले की, रोज स्वतःशी कोणतीही तडजोड न करण्याचा नियम देखील पाळला.

नुपूर पाटीलचा पोस्ट पाहा

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com