
Om Namo Bhagwate Vasudevay Namah Mantra : 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' मंत्र भगवान कृष्णाला समर्पित असा एक शक्तिशाली मंत्र आहे. या मंत्राचा नियमित सकाळी 24 मिनिटे जप केल्यास जीवनामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. या मंत्राचा अर्थ काय आहे आणि जप केल्यास कोणते विशेष लाभ मिळू शकतात? याची माहिती जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' मंत्राचा अर्थ - Om Namo Bhagwate Vasudevay Namah Meaning
अर्थ - हे वासुदेवनंदन भगवान मी तुम्हाला नमन करतो.
'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' मंत्राचे फायदे
- 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' हा एक मुक्तिमंत्र आहे. भगवान श्री कृष्ण ज्यांना वासुदेव देखील म्हटले जाते. वासुदेव या नावाचा अर्थ म्हणजे जे सर्व जिवांचे स्वामी आहेत.
- नियमित या मंत्राचा जप केल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मकता निर्माण होते.
- भगवान कृष्णाचा आशीर्वादही मिळतो.
- व्यक्तीमध्ये सहनशक्ती देखील वाढते.
- जीवनातील संघर्ष आणि आव्हानांचा सामना करण्याचा आत्मविश्वासही वाढतो.
(नक्की वाचा: Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी)
ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: मंत्राचा जप केल्यास मनामध्ये भक्ती आणि श्रद्धेची भावनाही निर्माण होते.
- या शक्तिशाली मंत्राचा जप केल्यास तुमचे मन आणि आत्मा शुद्ध होतो. विचारांमध्येही सकारात्मकता येते.
- मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. मानसिक तणाव दूर होतात.
- मानसिक शांतता मिळाल्यास सामाजिक संबंधही सुधारण्यास मदत मिळते.
- वागणुकीमध्ये समजूतदारपणा आणि सौम्यपणा दिसू लागतो.
(नक्की वाचा :Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world