जाहिरात

सावधान! जेवणाच्या प्लास्टिक कंटेनर्समधून 'कॅन्सर'चा धोका, पैसे देऊन आरोग्य धोक्यात घालू नका

FDA च्या संशोधनानुसार, प्लास्टिकमध्ये गरम अन्न ठेवल्यास सुमारे 55 ते 60 प्रकारची वेगवेगळी विषारी रसायने बाहेर पडतात. ही रसायने डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु अन्नाद्वारे ती थेट तुमच्या पेशींमध्ये पोहोचतात.

सावधान! जेवणाच्या प्लास्टिक कंटेनर्समधून  'कॅन्सर'चा धोका,  पैसे देऊन आरोग्य धोक्यात घालू नका

आजच्या धावपळीच्या युगात 'झोमॅटो' किंवा 'स्विगी'वरून काही सेकंदात जेवण मागवणे हे सोपं झालंय. गरम जेवण डब्यात बंद होऊन तुमच्या दारात काही मिनिटांत पोहोचते, पण हेच गरमागरम जेवण तुम्हाला मृत्यूच्या दारात नेऊ शकते. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये हे अन्न येते, ते तुमच्या शरीरात कॅन्सरसारख्या महाभयंकर आजाराचे बीज रोवत आहेत. 

प्लास्टिकमधून बाहेर पडतोय 'विषाचा' विळखा

जेव्हा गरम अन्न प्लास्टिकच्या डब्यात ठेवले जाते, तेव्हा त्या प्लास्टिकमधील रसायने अन्नात मिसळायला लागतात. FDA च्या संशोधनानुसार, प्लास्टिकमध्ये गरम अन्न ठेवल्यास सुमारे 55 ते 60 प्रकारची वेगवेगळी विषारी रसायने बाहेर पडतात. ही रसायने डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु अन्नाद्वारे ती थेट तुमच्या पेशींमध्ये पोहोचतात.

आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम

प्लास्टिकच्या या रसायनांमुळे केवळ पोटाचे विकारच नाही, तर शरीराच्या प्रत्येक अवयवावर वाईट परिणाम होतो. 

  • कर्करोग: प्रामुख्याने स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर आणि यकृताचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढते.
  • प्रजनन क्षमता: पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे आणि महिलांमध्ये PCOD किंवा वंध्यत्वासारख्या समस्या निर्माण होतात.
  • रोगप्रतिकारक शक्ती: रसायनांमुळे शरीराची नैसर्गिक आजारांशी लढण्याची शक्ती कमी होते.
  • गर्भवती आणि मुले: लहान मुलांच्या वाढीवर आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होतो.

(नक्की वाचा-  Salt Side Effect: ताटातील जेवणात चिमुटभर मीठ टाकताय? आताच 'ही' सवय मोडा, आरोग्यावर होतात सर्वात घातक परिणाम)

दैनंदिन आयुष्यात काय काळजी घ्यावी?

  • प्लास्टिकची पाण्याची बाटली कधीही उन्हात ठेवू नका किंवा गरम होऊ देऊ नका. गरम झाल्यास त्यातील रसायने पाण्यात उतरतात.
  • प्लास्टिकच्या डब्यात अन्न कधीही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नका, जरी त्यावर 'मायक्रोवेव्ह सेफ' असे लिहिले असले तरीही.
  • चहा किंवा गरम रस्सा प्लास्टिकच्या पिशवीत घेणे अत्यंत घातक आहे.
  • लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजणे टाळा.

सुरक्षित पर्याय कोणते?

स्टीलचे डबे हे सर्वात टिकाऊ आणि गरम अन्नासाठी सुरक्षित आहेत. काचेची भांडी मायक्रोवेव्हसाठी काच हा सर्वात उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. मातीची भांडी अन्नाची चव आणि आरोग्य टिकवण्यासाठी मातीची भांडी सर्वोत्तम आहेत. केळीची पाने किंवा लाकडाच्या भांड्यांचा वापर वाढवा.

अलीकडेच भारतातल्या मोठ्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सनीही या समस्येकडे लक्ष वेधले आहे. FSSAI ने खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये प्लास्टिकच्या वापरावर कडक निर्बंध आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, जोपर्यंत ग्राहक स्वतःहून प्लास्टिक टाळत नाही, तोपर्यंत हे संकट दूर होणार नाही. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळा आणि तुमचे व तुमच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवा.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com