जाहिरात

PhD Food Delivery Rider: ऑक्सफर्डची पदवी अन् पीएचडी, तरीही साधी नोकरी; उच्चशिक्षित तरुण का बनला डिलिव्हरी बॉय?

Overqualified Delivery Man Inspirational Story: डिंग हा उच्चशिक्षित डिलिव्हरी बॉय म्हणून ओळखला जात आहे. त्याने जगातील सर्वोच्च संस्थांमधून शिक्षण घेतले आहे.

PhD Food Delivery Rider: ऑक्सफर्डची पदवी अन् पीएचडी, तरीही साधी नोकरी; उच्चशिक्षित तरुण का बनला डिलिव्हरी बॉय?

PhD And Oxford Graduate Becomes Food Delivery Worker: चीनमधील 39 वर्षीय डिंग युआनझाओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याने जगभरातील नामांकित विद्यापीठांमध्ये घेतलेल्या पदव्या आणि सध्या करत असलेली सामान्य नोकरी. डिंग हा उच्चशिक्षित डिलिव्हरी बॉय म्हणून ओळखला जात आहे. त्याने जगातील सर्वोच्च संस्थांमधून शिक्षण घेतले आहे, परंतु चांगली नोकरी न मिळाल्यामुळे तो आता फूड डिलिव्हरीचे काम करत आहे. 

Akola News : अकोल्याच्या शेतकरी पुत्राची मोठी भरारी, BCCI च्या पंच परीक्षेत भारतातून आला पहिला

ऑक्सफर्डमध्ये डिग्री घेतलेला डिलिव्हरी बॉय (Oxford Graducate Delivary Boy)

डिंग युआनझाओने चीनच्या प्रतिष्ठित त्सिंगुआ विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी (Chemistry) प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी पेकिंग विद्यापीठातून ऊर्जा अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर( Degree In Engineering) पदवी प्राप्त केली. इतकेच नाही तर त्यांनी सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातून जीवशास्त्रात पीएचडी (PHD in Biology) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून जैवविविधतेत (Biodiversit) पदवी प्राप्त केली.

इतका उच्चशिक्षित असूनही डिंगला इच्छित नोकरी मिळू शकली नाही. त्याने अनेक कंपन्यांना बायोडेटा पाठवला, 10 हून अधिक मुलाखती दिल्या, परंतु यश मिळाले नाही. तो सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठात पोस्टडॉक्टरल संशोधक म्हणून काम करत होता, पण शेवटी त्याला फूड डीलिव्हरीची नोकरी स्वीकारावी लागली. आपण कोणते काम करतो यावरुन आपली क्षमता सिद्ध होत नाही, असं तो म्हणतो. 

CA Result 2025 : छत्रपती संभाजीनगरचा डंका, CA अंतिम परीक्षेत राजन देशातून पहिला; जिल्ह्यातील 7 विद्यार्थी रँकमध्ये

का करतोय डिलिव्हरी बॉयचे काम? (overqualified delivery man)

याबाबत डिंगची एक सोशल मीडिया पोस्टही चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो म्हणतो की,  ही एक स्थिर नोकरी आहे जी मला माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यास अनुमती देते. जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता आणि व्यायाम देखील करू शकता. डिंगने असेही म्हटले की तो मुलांना शिकवणी शिकवू शकत नाही तसेच त्याने महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, या बातमीबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक म्हणत आहेत की नोकरी मिळाली नाही तर अभ्यास करून काय उपयोग? त्याच वेळी काही लोकांनी डिंगच्या धाडसाचे आणि व्यावहारिक विचारसरणीचे कौतुक केले. त्याची कहाणी दर्शवते की शिक्षण कितीही उच्च असले तरी, जीवनातील आव्हानांना तोंड देण्याची खरी क्षमता महत्त्वाची असते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com