जाहिरात

Pet Care Tips: कुत्रे किंवा मांजरीच्या वासाने घरात टेन्शन? 'या' 4 सोप्या गोष्टींनी दूर होईल सर्व त्रास

Petcare Tips and tricks: अनेकदा या प्राण्यांमुळे घरात एक विशिष्ट प्रकारचा वास किंवा दुर्गंधी (Pet Odour) येऊ लागते. बऱ्याचदा चांगली स्वच्छता करूनही ही दुर्गंधी पाठ सोडत नाही.

Pet Care Tips: कुत्रे किंवा मांजरीच्या वासाने घरात टेन्शन? 'या' 4 सोप्या गोष्टींनी दूर होईल सर्व त्रास
Pet Care Tips: पल्या पाळीव प्राण्याला स्वच्छ कसे ठेवावे, याच्या काही सोप्या टिप्स
मुंबई:

Petcare Tips and tricks: पाळीव प्राणी (Pet Animals) हे कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतात. त्यांच्यामुळे घरात आनंद आणि उत्साह असतो. अनेकजण पाळीव प्राण्यांमध्ये  मित्र शोधतात. मात्र, अनेकदा या प्राण्यांमुळे घरात एक विशिष्ट प्रकारचा वास किंवा दुर्गंधी (Pet Odour) येऊ लागते. बऱ्याचदा चांगली स्वच्छता करूनही ही दुर्गंधी पाठ सोडत नाही. घरात येणारी ही दुर्गंधी कशी दूर करावी आणि आपल्या पाळीव प्राण्याला स्वच्छ कसे ठेवावे, यासाठी काही सोपे उपाय आणि टिप्स (Petcare Tips and Tricks) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पाळीव प्राण्यांची स्वच्छता आणि काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

1. योग्य प्रकारे स्नान (Bath) घाला : पाळीव प्राण्यांना नियमितपणे चांगल्या प्रकारे न्हाऊ घालावे. यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, माणसांसाठी वापरला जाणारा शाम्पू (Shampoo) त्यांच्यासाठी वापरू नका. पाळीव प्राण्यांसाठी (Pet Animals) विशेषतः बनवलेल्या शाम्पूचाच वापर करा.

केस सुकवा: प्राण्यांना न्हाऊ घातल्यानंतर त्यांचे केस व्यवस्थित सुकवा. शक्य असल्यास, न्हाऊ घातल्यानंतर तुमच्या मांजरीला (Cat) किंवा कुत्र्याला (Dog) काही काळ उन्हात बसवा. यामुळे त्यांच्या केसातील ओलावा (Moisture) दूर होतो आणि दुर्गंधी येत नाही.

2. अंथरुण आणि खेळणी स्वच्छ ठेवा : केवळ प्राण्याची स्वच्छता पुरेशी नाही, तर त्यांचे अंथरुण (Bedding) आणि खेळणी (Toys) स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

अंथरुण धुवा: आठवड्यातून किमान 2 वेळा पाळीव प्राण्याचे अंथरुण धुतले पाहिजे.

खेळणी स्वच्छ ठेवा: रबरच्या खेळण्यांना (Rubber Toys) देखील नियमितपणे धुऊन स्वच्छ करत रहा. अंथरुण आणि खेळणी दोन्ही वस्तू स्वच्छ केल्यावर त्या उन्हात सुकण्यासाठी ठेवा.

जागा स्वच्छ ठेवा: या व्यतिरिक्त, तुमचा पाळीव प्राणी जास्त वेळ ज्या ठिकाणी घालवतो, ती जागा देखील वेळोवेळी स्वच्छ करा.

( नक्की वाचा : Diwali Tips and Tricks: मोठी समस्या संपली! घरात उंदीर असतील तर न मारता पळवून लावण्यासाठी लगेच वापरा ही ट्रिक )
 

3. पंजाची स्वच्छता महत्त्वाची : पाळीव प्राण्यांच्या पायांची (Paws) स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे. पायामध्ये अडकलेली घाण देखील दुर्गंधीचे मुख्य कारण असू शकते.

सुरक्षित क्लिनर वापरा: पंजा स्वच्छ करण्यासाठी 'पेट सेफ क्लिनर' (Pet Safe Cleaner) चा वापर करा, जो तुमच्या प्राण्यासाठी सुरक्षित असेल.

4. त्यांच्या आहाराकडे लक्ष द्या : अनेकदा संसर्गामुळे पाळीव प्राणी अन्न खात नाहीत. ते अन्न व्यवस्थित पचवू शकले नाहीत, तर त्यातूनही दुर्गंधी येऊ शकते.

डॉक्टरांचा सल्ला घ्या: असे झाल्यास, तुम्ही त्वरित पशुवैद्यकीय डॉक्टरांशी (Veterinary Doctor) संपर्क साधा आणि त्यांच्या आहारामध्ये (Diet Chart) आवश्यक बदल करा.

स्पष्टीकरण : वरील बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क त्याची जबाबदारी घेत नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com