जाहिरात

Pitru Paksha 2025 Upay: पितृपक्षात पितरांचा आशीर्वाद कसा मिळेल? श्राद्ध, तर्पण आणि दानाचे नियम जाणून घ्या

Pitru Paksha 2025 Upay: पितृपक्षातील 15 दिवसांत पितरांना संतुष्ट करण्यासाठी नेमके काय करावे? पितरांचा आशीर्वाद कसे मिळले? कोणत्या चुका करणं टाळावे? पितृपक्षाशी संबंधित सर्व समस्या जाणून घ्या...

Pitru Paksha 2025 Upay: पितृपक्षात पितरांचा आशीर्वाद कसा मिळेल? श्राद्ध, तर्पण आणि दानाचे नियम जाणून घ्या
Shradh 2025 Rules and Remedies: पितृपक्षामध्ये श्राद्ध करताना हे 10 नियम लक्षात ठेवा

Pitru Paksha 2025 Rules And Remedies: हिंदू धर्मामध्ये आईवडील केवळ जिवंत असतानाच नव्हे तर मृत्यूनंतरही त्यांच्याप्रति आदर आणि श्रद्धा व्यक्त केली जाते. पितरांच्या रुपातील पूर्वजांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष. पितरांना मुक्ती मिळावी, यासाठी पितृपक्षामध्ये पौर्णिमेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा पाळली जाते. मान्यतेनुसार विधीवत केलेले श्राद्ध, तर्पणासह अन्य गोष्टी पितरांना प्राप्त होतात, असे म्हणतात. पितृपक्षादरम्यान कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करणे टाळावे, याबाबत माहिती जाणून घेऊया...

पितृपक्षामध्ये काय करावे आणि काय करू नये? | Pitru Paksha 2025 Rules And Remedies In Marathi

1. पितृपक्ष म्हणजे केवळ पितरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ नव्हे तर यादरम्यान पूर्वजांबाबत कळत-नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्तही केले जाते. भूतकाळामध्ये चुकून तुमच्याकडून पूर्वजांबद्दल काही चूक झाली असेल तर तिथीनुसार तर्पण, श्राद्ध इत्यादी गोष्टी करताना त्यांची माफी मागा आणि स्वतःच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. 

2. हिंदू मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये सात्विक अन्नाचे सेवन करावे, ब्रह्मचर्य जीवन जगले पाहिजे. पितृपक्षात असे कोणतेही काम करू नये ज्यामुळे पूर्वजांच्या भावना दुखावल्या जातील.

3. पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या श्राद्ध तिथीनुसार स्वतःच्या क्षमतेनुसार दान करावे. एखाद्या गरजवंताला किंवा ब्राह्मणाला दान करताना मनामध्ये कोणताही अहंकार येऊ देऊ नये, दान केल्याचा गाजावाजाही करू नये. अन्यथा योग्य फळ मिळणार नाही.   

Pitru Paksha 2025 Calendar: 7 की 8 सप्टेंबर कधीपासून सुरू होतोय पितृपक्ष? जाणून घ्या श्राद्धच्या तिथी एका क्लिकवर

(नक्की वाचा: Pitru Paksha 2025 Calendar: 7 की 8 सप्टेंबर कधीपासून सुरू होतोय पितृपक्ष? जाणून घ्या श्राद्धच्या तिथी एका क्लिकवर)

4. पितरांच्या निमित्ताने तुमच्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार अन्न, फळे, कपडे, पैसे इत्यादी गोष्टींचे दान करावे. इच्छेविरोधात किंवा रागाच्या भरात दान करू नये. शक्य असल्यास दान करण्यापूर्वी मंदिरातील पुजाऱ्यांकडून संकल्प करुन घ्यावा. 

5. हिंदू मान्यतेनुसार पितृपक्षादरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नये. उदाहरणार्थ साखरपुडा, लग्न, गृहप्रवेश, बारसे इत्यादी गोष्टी करणे टाळावे. पितृपक्षाऐवजी नवरात्रौत्सवामध्ये या गोष्टी कराव्या.

6. मान्यतेनुसार पितृपक्षात तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. श्राद्धाच्या काळादरम्यान लसूण, कांदा, वांगी, मुळा, कारले, गाजर, काकडी इत्यादी भाज्या आणि उडीद, मसूर, हरभरा यासारख्या डाळींचे सेवन करू नये.  या गोष्टींचे सेवन केल्याने पितृदोष लागण्याची शक्यता असते, असे म्हणतात.

7. हिंदू मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये पितरांना प्रसन्न करुन त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे. संध्याकाळी दक्षिण दिशेमध्ये तीळ किंवा मोहरीच्या तेलाने दिवा प्रज्वलित करावा. 

Pitru Paksha 2025: पितृ दोषापासून मुक्ती मिळवायची आहे?  करा  'हे' 7 सोपे उपाय

(नक्की वाचा: Pitru Paksha 2025: पितृ दोषापासून मुक्ती मिळवायची आहे? करा 'हे' 7 सोपे उपाय)

8. पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाचा संबंध आपल्या पितरांशी असतो, असे म्हणतात. पितृपक्षामध्ये दरदिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा, असे केल्यास पितृदोष दूर होण्यास मदत मिळू शकते. 

9. पितृपक्षामध्ये भक्तीने श्राद्ध आणि तर्पण न केल्यास पूर्वज नाराज होतात. ज्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते, असे म्हणतात. 

10. पितृपक्षात भक्तीभावाने श्राद्ध आणि तर्पण केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनाशी संबंधित सर्व दोष दूर होण्यास मदत मिळू शकते. तुमचे कुटुंब, धन, संपत्ती आणि कीर्तीमध्ये वाढ होते. पितृपक्षामध्ये श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख मिळते, असेही म्हणतात. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com