जाहिरात

1 एप्रिलपासून महागाईचा झटका! कार, टीव्ही आणि फ्रीजसह अनेक वस्तूंच्या किमतीत होणार मोठी वाढ

1 एप्रिलपासून कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे कार, टीव्ही, फ्रीज आणि एसीच्या किमतीत 5 ते 6 टक्क्यांनी वाढ होणार आहे. रुपयाचे मूल्य घसरल्याने आणि वाहतूक खर्च वाढल्याने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

1 एप्रिलपासून महागाईचा झटका! कार, टीव्ही आणि फ्रीजसह अनेक वस्तूंच्या किमतीत होणार मोठी वाढ

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात सर्वसामान्यांसाठी महागडी ठरणार आहे. प्लास्टिक, रेझिन आणि पॉलिमर यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत अचानक झालेली वाढ आणि जागतिक स्तरावर मालवाहतुकीचे दर वाढल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील वस्तूंच्या किमती 5 ते 10 टक्क्यांनी वाढू शकतात.

कच्च्या मालाचा परिणाम आणि मालवाहतूक खर्च

कंपन्यांना उत्पादन खर्च आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचा खर्च अधिक येत असल्याने हा भार ग्राहकांवर टाकला जाणार आहे. प्लास्टिक आणि पॉलिमर महागल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्मिती खर्चात वाढ झाली आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर मालवाहतुकीचे (Freight) दर 7 ते 10 टक्क्यांनी वधारले आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य सुमारे 2 टक्क्यांनी घसरल्याने आयात होणारा माल महाग झाला आहे.

(नक्की वाचा-  IPL 2026: SRH ला मिळणार नवा कर्णधार? टी20 वर्ल्ड कप गाजवणारा 'धुरंधर' करणार हैदराबादचं नेतृत्व?)

कार आणि दुचाकींच्या किमतीत वाढ

वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता अधिक बजेट ठेवावे लागणार आहे. मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) आणि ऑडी (Audi) सारख्या कंपन्यांनी 1 एप्रिलपासून किमतीत 2 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. इतर कार उत्पादक कंपन्याही 2 ते 3 टक्क्यांनी दर वाढवण्याच्या तयारीत आहेत.

(नक्की वाचा-  'Dhurandhar' Trailer: धुरंधर सिनेमातील 'या' कलाकाराची वाढली डोकेदुखी; रोज मिळत आहेत धमक्या)

घरगुती उपकरणे आणि इतर वस्तूही महागणार

केवळ वाहनेच नाही, तर घरातील दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीतही मोठी वाढ होणार आहे. टीव्ही, फ्रीज आणि एअर कंडिशनर (AC) 5 ते 6 टक्क्यांनी महाग होतील. शूज आणि सिंथेटिक फायबरचे कपडे 9 ते 10 टक्क्यांनी महाग होऊ शकतात. घरात वापरले जाणारे डेकोरेटिव्ह पेंट देखील महागणार आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com