Holidays List 2025: नवे वर्ष 2025मध्ये मिळणार इतके दिवस सुटी, ही यादी पाहून करा प्लानिंग

Holidays List 2025 : नवीन वर्षामध्ये किती आहेत लाँग वीकेंड? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण यादी...

जाहिरात
Read Time: 1 min

Holidays List 2025: नवीन वर्ष 2025मधील शासकीय सुट्यांचे कॅलेंडर जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्ट्याची माहिती जारी केली आहे. कारण नोव्हेंबर-डिसेंबर महिना येताच सर्वजण शासकीय सुट्या जाणून घेण्यासाठी आतुर असतात. कोणकोणत्या सुट्या मिळणार? आणि शनिवार-रविवारमुळे कोणत्या सुट्या वाया जाणार? हे सर्वांनाच जाणून घ्यायचे असते. कारण लाँग वीकेंड पाहून लोक वेगवेगळ्या गोष्टींचे नियोजन करतात. नवीन वर्षामध्ये एकूण पाच लाँग वीकेंड मिळत आहे, चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुटीचा दिवस  तारीख वार 
1 प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रविवार
2 छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी बुधवार
3 महाशिवरात्री 26 फेब्रुवारी बुधवार
4 होळी 14 मार्च शुक्रवार
5 गुढीपाडवा 30 मार्च रविवार
6 रमझान ईद (ईद-उल-फितर)  31 मार्च सोमवार
7 रामनवमी 06 एप्रिल रविवार
8 महावीर जन्म कल्याणक 10 एप्रिल गुरुवार
9 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल सोमवार
10 गुड फ्रायडे 18 एप्रिल शुक्रवार
11 महाराष्ट्र दिन 01 मे गुरुवार
12 बुद्ध पौर्णिमा 12 मे सोमवार
13 बकरी ईद (ईद-उल-झुआ) 07 जून शनिवार
14 मोहरम 06 जुलै रविवार
15 स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट शुक्रवार
16 पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) 15 ऑगस्ट शुक्रवार
17 गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट बुधवार
18 ईद-ए-मिलाद 05 सप्टेंबर शुक्रवार
19 महात्मा गांधी जयंती 02 ऑक्टोबर गुरुवार
20 दसरा 02 ऑक्टोबर गुरुवार
21 दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) 21 ऑक्टोबर मंगळवार
22 दिवाळी (बलिप्रतिपदा) 22 ऑक्टोबर बुधवार
23 गुरुनानक जयंती 05 नोव्हेंबर बुधवार
24 ख्रिसमस 25 डिसेंबर गुरुवार

(नक्की वाचा: 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी', विद्यार्थ्यांसाठी APPAR ID महत्त्वाचे! जाणून घ्या कार्डचे महत्त्व आणि कसा कराल अर्ज?)