जाहिरात

'वन नेशन, वन स्टुडंट आयडी', विद्यार्थ्यांसाठी APPAR ID महत्त्वाचे! जाणून घ्या कार्डचे महत्त्व आणि कसा कराल अर्ज?

APAAR ID CARD: अपार आयडी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. जाणून घ्या कार्डचे महत्त्व आणि अर्ज करण्याची सोपी प्रोसेस

'वन नेशन, वन  स्टुडंट आयडी', विद्यार्थ्यांसाठी APPAR ID महत्त्वाचे! जाणून घ्या कार्डचे महत्त्व आणि कसा कराल अर्ज?
मुंबई:

Apaar ID Card Scheme: विद्यार्थ्यांच्या आणि कंपन्यांच्या सोईसाठी केंद्र सरकारने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी (Automated Permanent Academic Account Registry) काढण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे विद्यार्थी त्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेतील उपक्रम आणि इतर शैक्षणिक कामांची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी हे ओळखपत्र तयार करण्यात आले आहे. 


 ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )


काय आहे अपार आयडी? 
भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेली एक विशेष ओळख प्रणाली आहे. हा उपक्रम 2020 च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सरकारने सुरू केलेल्या 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' कार्यक्रमाचा एक भाग आहे. हे शैक्षणिक रिकॉर्ड दिर्घकाळ जपून ठेवण्याचे एक माध्यम आहे. आधारकार्डप्रमाणेच 12 अंकी नंबर असलेले हे ओळखपत्र असते.  

मास्क आधारकार्ड डाऊनलोड करा, फसवणुकीचा धोका टाळा!

(नक्की वाचाः मास्क आधारकार्ड डाऊनलोड करा, फसवणुकीचा धोका टाळा)

अपार आयडीमुळे, आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडीट डिजिटली स्टोर करणे सहज शक्य होणार आहे. विद्यार्थी त्यांचे खाते आणि एक्सेस स्वतः मॅनेज करू शकतात. ज्यामध्ये  विद्यार्थ्यांचा स्कोर रेकॉरेड म्हणजेच मार्कशीट, ग्रेडशीट, सर्व प्रकारचे सर्टिफिकेट्स अशा सर्व  गोष्टींचा यामध्ये समावेश असणार आहे. 

अपार कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर डिजीलॉकर वर खाते असणे गरजेचं आहे. त्याआधारे केवायसी करून शाळा, कॉलेजकडून अपार कार्ड दिले जाते. 

काय आहे 2.0  पॅन कार्ड ? जुनं पॅन कार्ड-ई पॅन आणि पॅन 2.0 मध्ये नक्की फरक काय?

(नक्की वाचाः काय आहे 2.0 पॅन कार्ड ? जुनं पॅन कार्ड-ई पॅन आणि पॅन 2.0 मध्ये नक्की फरक काय?)

नोंदणी प्रक्रियाः

अपार आयडी मिळवण्यासाठी apaar.education.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, आईचे नाव, वडिलांचे नाव,आधारनुसार नाव,आधार क्रमांकाची गरज आहे. 

या व्यतिरिक्त, डिजी लॉकर हा अ‍ॅप डाउनलोड करा किंवा  डिजी लॉकरच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन  डिजी लॉकर खाते तयार करा.

साइन अप साइन अप करून मोबाईल, आधार नंबर टाकून घ्या.

ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि डिजिलॉकर खात्याशी लॉगिन करा.

त्यानंतर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडीटमस पर्यायावर जा.

शाळा, कॉलेज, युनिवरसिटीबद्द्ल माहीती भरा.

फॉर्म सबमिट करा आणि अपार आयडी तयार करा.

'One nation, One Student ID', APPAR ID important for students! Know the importance of the card and how to apply?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com