
Putrada Ekadashi 2025: भगवान विष्णूची कृपादृष्टी कायम राहावी, यासाठी एकादशीचे (Ekadashi Vrat) व्रत करणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. मान्यतेनुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा येणाऱ्या एकादशी व्रताच्या शुभ प्रभावामुळे श्रीहरी भाविकांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi 2025) साजरी केली जाते. यंदा 5 ऑगस्ट 2025 रोजी पुत्रदा एकादशी आहे. पुत्रदा एकादशीचे (Putrada Ekadashi 2025 Kadhi Ahe) व्रत कशा पद्धतीने करावे, शुभ मुहूर्त काय, कोणते फायदे मिळतील याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास कोणते लाभ मिळतात?
- जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते.
- संतती सुख मिळते, असेही म्हणतात.
- भगवान विष्णूची कृपादृष्टी कायम राहते.
पुत्रदा एकादशी शुभ मुहूर्त (Putrada Ekadashi 2025 Shubh Muhurat)
5 ऑगस्ट 2025
लाभ मुहूर्त : सकाळी 10.48 वाजेपासून ते दुपारी 12.18 वाजेपर्यंत आहे.
अमृत योग : दुपारी 12.19 वाजेपासून ते दुपारी 13.49 वाजेपर्यंत आहे.
शुभ योग : दुपारी 15.20 वाजेपासून ते संध्याकाळी 16.50 वाजेपर्यंत आहे.
पुत्रदा एकादशी 2025 व्रताची पूजा विधी (Putrada Ekadashi 2025 Puja Rituals)
- भगवान श्रीविष्णूची कृपादृष्टी मिळवण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करावी.
- पुत्रदा एकादशीचे व्रत विधीनुसार करण्याचा संकल्प करावा.
- देवघरात किंवा ईशान्य दिशेला बसून भगवान विष्णूच्या मूर्तीवर जल, वस्त्र, पुष्प, फळ आणि तुळस इत्यादी गोष्टी अर्पण करुन पूजा करावी.
- पिवळी फुले आणि पिवळ्या रंगाची मिठाई देखील अर्पण करावी.
- एकादशी व्रताची कथा ऐकावी किंवा पूजेनंतर भगवान विष्णूची आरती करावी.
- पुत्रदा एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त वेळा श्री हरी नाम मंत्राचा तुळशी माळेने जप करावा.
(नक्की वाचा: Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत चुकून सुटल्यास काय करावे? प्रायश्चित्त आणि उपाय जाणून घ्या)
पुत्रदा एकादशी पारण वेळ (Putrada Ekadashi 2025 Paran Time)- पारण म्हणजे विधीवत उपवास सोडणे.
- पारण वेळ : 6 ऑगस्ट सकाळी 05:45 वाजेपासून ते सकाळी 08:26 वाजेपर्यंत पारण वेळ आहे.
- अन्नदान केल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world