जाहिरात

Putrada Ekadashi 2025 Wishes: निरोगी आरोग्य, सुखसमृद्धी लाभो! पुत्रदा एकादशीनिमित्त पाठवा मंगलमय शुभेच्छा

Putrada Ekadashi 2025 Wishes In Marathi: मित्रपरिवार आणि नातेवाईकांना पुत्रदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा नक्की पाठवा.

Putrada Ekadashi 2025 Wishes: निरोगी आरोग्य, सुखसमृद्धी लाभो! पुत्रदा एकादशीनिमित्त पाठवा मंगलमय शुभेच्छा
"Putrada Ekadashi 2025 Wishes In Marathi: पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!"

Putrada Ekadashi 2025 Wishes In Marathi : हिंदू धर्मातील पुत्रदा एकादशी हे महत्त्वाच्या व्रतांपैकी एक मानले जाते. जे विशेषतः निरोगी आरोग्य, सुखसमृद्धी आणि संतानप्राप्तीसाठी ओळखले जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूची भक्तिभावाने पूजा केल्यास त्याचे चांगले फळ मिळते, असे म्हणतात. पौष आणि श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी येते. श्रद्धेने आणि मनोभावे केलेल्या या व्रताचे महत्त्व खूप आहे. पुत्रदा एकादशीच्या (Putrada Ekadashi 2025 Wishes) निमित्ताने आपल्या प्रियजनांना सकारात्मक आणि मंगलभावना असलेल्या शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.  

पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा (Putrada Ekadashi 2025 Wishes In Marathi)

1. पवित्र पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने
भगवान श्री विष्णू तुमच्यावर कृपा करो
निरोगी आरोग्य, सुखसमृद्धी लाभो
आपल्या कुटुंबात नेहमी आनंद, प्रेम आणि सौख्य नांदो
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! (Putrada Ekadashi 2025)

2. एकादशीचे पावन व्रत 
जीवनात घडवो चांगल्या गोष्टींचा शुभारंभ
श्रीहरींचा आशीर्वाद लाभो तुम्हाला 
संपूर्ण जीवन आनंदाने भरून जावो 
शुभ पुत्रदा एकादशी 2025! 

3. सकारात्मक ऊर्जा
सात्त्विक विचार आणि
शुभ संकल्पांची पूर्ती लाभो
पुत्रदा एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

4. भगवान विष्णू इच्छित फल देवो
आयुष्यात सौख्य, समाधान आणि कुटुंबसुख प्राप्त होवो
पुत्रदा एकादशी 2025 मंगलमय शुभेच्छा! 

5. आजच्या पवित्र दिनी 
श्री विष्णू चरणी प्रार्थना करतो की 
तुमचे जीवन आनंदाने बहरो 
कधीच दुःखाचा स्पर्शही होवो नये 
शुभ पुत्रदा एकादशी 2025!  

6. श्री हरिचे स्मरण हेच जीवनाचे सौख्य 
आजच्या दिवशी त्यांचे स्मरण करून
मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध होवो
पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा!

7. पुत्रदा एकादशीचं व्रत करताना
शुद्ध अंतःकरण आणि भक्तीभाव आवश्यक 
तुमच्या भक्तीवर श्री विष्णू प्रसन्न होवो 
आणि जीवनात यशस्वी वाटचाल घडो 
शुभ पुत्रदा एकादशी 2025!

8. सत्कर्म, उपवास आणि भगवंतावर विश्वास 
हाच या एकादशीचा संदेश 
शुभ दिवशी कौटुंबिक एकता आणि यश लाभो
पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा!

9. एकादशीचा उपवास केवळ शरीरासाठी नव्हे
तर आत्मशुद्धीसाठी आहे
श्री विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहो
शुभ पुत्रदा एकादशी 2025!

10. भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण
त्यांचे गुणगान आणि प्रार्थना 
या दिवशी केलेल्या भक्तीने
सर्व इच्छा होतील पूर्ण   
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 

11. जीवनातील अंध:कार दूर होवो
प्रकाशमय विचार जागृत होवो
पवित्र दिनी सर्वजण आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होवो 
पुत्रदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

12. भगवंताच्या चरणी भक्तीपूर्वक नतमस्तक होऊन
शुद्ध अंतःकरणाने केलेले व्रत
कधीच निष्फळ जात नाही
आपल्याला हवी ती कृपा मिळो 
पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा!

13. सात्त्विकता, संयम आणि श्रद्धा
हेच व्रताचे खरे सौंदर्य  
भगवान विष्णू तुमच्या जीवनात
सदैव आनंद आणि समाधानाचा आशीर्वाद देवो
पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा! 

14. पुत्रदा एकादशीचे व्रत म्हणजे
भक्ती, समर्पण आणि श्रद्धेचा संगम
तुमच्या कुटुंबात सदा सौख्य
शांती आणि समाधान नांदो
पुत्रदा एकादशी 2025 मंगलमय शुभेच्छा! 

15. व्रत, उपवास आणि सेवा 
या त्रिसूत्राने जीवन होते अधिक प्रसन्न
पुत्रदा एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com