Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाचा इतक्या तासांचा आहे शुभ मुहूर्त, भावाच्या राशीनुसार अशी निवडा राखी

Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन सणावर भद्रकाळाचे सावट नाहीय, ज्यामुळे 9 ऑगस्टला सकाळपासून ते दुपारपर्यंत राखी बांधणे शुभ ठरणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Raksha Bandhan 2025: भावाच्या राशीनुसार राखी निवडा

Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन सणावर भद्रकाळाचे सावट नाहीय. त्यामुळे बहिणींना त्यांच्या भावांना राखी बांधण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. 9 ऑगस्ट रोजी सूर्योदयापासून सुमारे साडेसात तासांचा काळ शुभ (Raksha Bandhan 2025 Shubh Muhurat) मानला जात आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 5:47 वाजता होईल आणि पौर्णिमा तिथी दुपारी 1:25 वाजेपर्यंत राहील. यानुसार बहिणी सकाळपासून ते दुपारपर्यंत आपल्या भावांना राखी बांधू शकतात. पंचांगानुसार यंदा रक्षाबंधन सणादरम्यान भद्रकाळाचे (Bhadra Kaal On Raksha Bandhan 2025) सावट नाही. म्हणजेच सण साजरा करताना कोणत्याही प्रकारचे अडथळे नसणार किंवा निषिद्ध वेळ नसेल.

रक्षाबंधन सणाला जुळून आले खास योग (Raksha Bandhan 2025 Tithi And Nakshatra)

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:13 वाजता सुरुवात होत आहे आणि उदया तिथी 9 ऑगस्ट रोजी आहे. यामुळे रक्षाबंधन सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.  हे दोन्ही योग 9 ऑगस्ट दुपारी 2:24 वाजेपर्यंत असतील. ज्योतिषशास्त्रानुसार असा योगायोग जुळून आल्याने रक्षाबंधन अधिक खास ठरत आहे. 

(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन कधी आहे? योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि राखी काढण्याची माहिती जाणून घ्या)

रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? (Raksha Bandhan Religious Significance)

  • 8 ऑगस्ट रोजी रात्री पौर्णिमा तिथीदरम्यान व्रत करणारे भाविका श्री सत्यनारायणाची कथा वाचून पूजा करू शकतात. 
  • 9 ऑगस्ट रोजी स्नानदान आणि पूजा पठण करावे.
  • रक्षाबंधन सण केवळ भाऊबहिणीचा सण नव्हे तर यासह कित्येक परंपरा देखील जोडल्या गेलेल्या आहेत. 
  • या दिवशी केवळ बहिणींकडूनच नव्हे तर घरातील थोरांकडून किंवा पुरोहितांकडूनही रक्षासूत्र बांधून घ्यावे. 
  • आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्यावा, यामुळे घरात सुख-शांती निर्माण होईल आणि प्रगती देखील होईल. 

Advertisement

(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: तुमच्या भावाची होईल मोठी प्रगती, ज्योतिषींच्या माहितीनुसार रक्षाबंधनाला बांधा अशी राखी)

भावासाठी कोणत्या रंगाची राखी ठरेल शुभ (Lucky Rakhi Colors According To Rashi)

भावाच्या राशी आणि जन्म तारखेनुसार राखीचा रंग निवडला तर त्यांचे नशीब चमकू शकते. भावाचा कित्येक प्रकारे फायदा होईल आणि त्यांना अनेक संधी देखील मिळतील. परंपरेनुसार लाल, पिवळा आणि सोनेरी रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते. पण ज्योतिषशास्त्रानुसार राखीचा रंग जन्मतारखेनुसार देखील ठरवता येऊ शकतो.

जन्म तारखेनुसार कोणत्या रंगाची राखी घ्यावी? (Right Color of Rakhi According To Brother's Birth Date)

  • 1, 10, 19, 28  : लाल, गुलाबी, केशरी रंगाची राखी
  • 2, 11, 29  : पांढरा आणि क्रीम रंगाची राखी
  • 3, 12, 21, 30 : पिवळा किंवा सोनेरी रंगाची राखी 
  • 4, 13, 22, 31 : तेजस्वी प्रकारातील राखी 
  • 5, 14, 23 : पांढऱ्या रंगाची राखी
  • 7, 16, 25 : चमकदार आणि रंगीबेरंगी रंगाची राखी
  • 8, 17, 26 : निळा आणि तपकिरी रंगाची राखी
  • 9, 18, 27 : लाल, गुलाबी, नारंगी रंगाची राखी

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)