
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन केवळ सण नाहीय तर भाऊबहिणीचे नाते अधिक मजबूत करण्याचे माध्यम देखील म्हटलं जाते. बहीण केवळ भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही तर त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुरक्षा, यश आणि सुख-शांतीसाठी मनापासून प्रार्थना देखील करते. यंदा रक्षाबंधनाचा सण शनिवारी (9 ऑगस्ट 2025) रोजी साजरा करण्यात येणार आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला येणाऱ्या या दिवसाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व विशेष असल्याचे सांगितले जात आहे.
ज्योतिषी जय मदान यांचा खास सल्ला | Raksha Bandhan 2025 Tips From Jai Madan
ग्रहांचा प्रभाव
यंदा चंद्र कुंभ राशीमध्ये असेल, जो भावनिक संतुलन आणि उच्च आदर्श दर्शवतो. तर मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये असेल, जो नात्यांमध्ये स्पष्टता आणि सुरक्षिततेची भावना वाढवतो. म्हणजेच भाऊ आणि बहिणीमधील नाते अधिक मजबूत करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे.
राखी बांधण्यासाठी कोणती दिशा ठरेल शुभ? (Raksha Bandhan Shubh Disha)
डॉ. मदान यांनी सांगितले की, राखी बांधताना भाऊबहीण दोघांनी उत्तर पूर्व दिशेला ( ईशान्य) मुख करुन बसावे. ही दिशा देवतांची आणि संपूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा मुख्य स्त्रोत मानली जाते. या दिशेकडे मुख करून राखी बांधल्यास नात्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद असंख्य पटींनी वाढू शकतात.
(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन कधी आहे? योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि राखी काढण्याची माहिती जाणून घ्या)
भावाला कोणता टिळा लावणे ठरेल सर्वाधिक शुभ? (Raksha Bandhan 2025 Shubh Tilak)
राखी बांधण्यासह भावाला टिळा लावणे देखील महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. मदान यांच्या माहितीनुसार टिळा लावण्याचा ग्रहांशी संबंध असतो आणि योग्य पद्धतीने टिळा लावल्यास भावाच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात.
- कुंकवाचा टिळा अंगठ्याने लावावे : मंगळ ग्रहाचे प्रतीक, धैर्य आणि पुढाकाराची भावना जागृत करते.
- केशरी रंगाचा टिळा तर्जनीने लावावा : गुरु ग्रह सक्रिय होतो, जीवनात ज्ञान आणि स्थैर्य आणतो.
- चंदनाचा टिळा अनामिकेने लावावा : चंद्राचे प्रतीक, मन शांत आणि नात्यांमध्ये ताळमेळ राखण्याची ताकद देतो.
- प्रत्येक बोट आणि प्रत्येक तिलकाचे ग्रहांशी संबंधित स्वतःचे असे कंपन असते, टिळा योग्य पद्धतीने लावल्यास भावालाही त्याच प्रकारचे आशीर्वाद मिळतात.
(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: भाऊ किंवा बहीण नसेल तर कोणी कोणाला राखी बांधावी?)
थाळीमध्ये दुर्वा का ठेवाव्या?
काही लोक भावाला राखी बांधताना थाळीमध्ये दुर्वा ठेवणं विसरतात. डॉ. जय मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्वा गणपतीशी संबंधित आहेत, जी एखाद्या कामाचा शुभारंभ, बुद्धी आणि अडथळे दूर करणारी देवता मानली जाते. औक्षणाच्या ताटामध्ये दुर्वा ताटात ठेवल्यास भावाच्या जीवनात स्थैर्य येते आणि यशाचा मार्ग मोकळा होतो.
2025 मधील रक्षाबंधन विशेष का आहे?
डॉ. मदान यांच्या माहितीनुसार, यंदा ग्रहांचा समन्वय अतिशय शुभ संकेत देत आहेत.
- चंद्र कुंभ राशीमध्ये असल्याने भावनिक जबाबदारी आणि सामूहिक पाठिंबा वाढेल.
- मिथुन राशीमध्ये मंगळ असल्याने निर्णय घेण्याची क्षमता आणि बाहेरील धोक्यांपासून संरक्षण मिळू शकते.
- बुध ग्रह सिंह राशीमध्ये असल्याने चांगले संवाद, विशेषतः काही काळापासून दूर राहिलेल्या किंवा दुरावा निर्माण झालेल्या भावंडांसाठी चांगला काळ आहे.
- वृषभ राशीमध्ये गुरू असल्याने आर्थिक समृद्धी आणि कौटुंबिक स्थैर्याचा आशीर्वाद मिळेल.
(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला 95 वर्षानंतर जुळून आलाय अनोखा योग, जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त)
या ग्रहांची एकत्रित स्थिती असे वातावरण निर्माण करतात आहेत, जेथे संरक्षणाची भावना आणि नाते दोन्ही मजबूत होऊ शकतात. या नक्षत्रांमुळे राखी अधिक प्रभावी होऊ शकते. जर या नक्षत्रांमध्ये भावाला राखी बांधली तर त्याचा प्रभाव आणखी वाढू शकतो:
- पूर्वा फाल्गुनी :आनंद, कौटुंबिक सुरक्षा आणि उत्सवाचे प्रतीक.
- उत्तर फाल्गुनी : वचनबद्धता आणि सच्चे नाते मजबूत होईल.
- हस्त नक्षत्र : काळजी, उपचार आणि भावनिक समजुतीची भावना.
या शुभ नक्षत्रांदरम्यान भावाला राखी बांधली तर केवळ धागा नसतो तर वर्षभर सुरू राहणारे एक वचन होऊन जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world