विज्ञानाच्या दृष्टीने एक अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाची घटना सध्या घडत आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर 'डाग' तयार झाले आहेत. मजबूत चुंबकीय क्षेत्रांमुळे उष्णता कमी झाल्यामुळे हे सूर्य डाग तयार होतात. तुलनेने थंड असल्याने ते सूर्यांच्या पृष्ठभागावर गडद दिसतात. पुढील 10 दिवस सतत हे पाहता येणार आहेत.
दुर्मिळ घटनेची पुनरावृत्ती
मुंबईतील नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे म्हटलं की, सूर्याच्या पृष्ठभागाला फोटोस्फियर म्हणतात आणि तो सध्या अनेक गडद डागांनी व्यापले आहे. यापूर्वी 1947 मध्ये आणि ऑक्टोबर 2014 मध्ये अशाच प्रकारचा एक मोठा समूह सूर्यावर दिसला होता. सूर्य डागांमुळे अत्यंत शक्तिशाली सौर ज्वाला निर्माण होऊ शकतात. या सौर ज्वालांमुळे कोरोनल मास इजेक्शन नावाच्या घटना घडतात. ज्यात विद्युत भारित कण (Electrically Charged Particles) अवकाशात फेकले जातात. जेव्हा ते पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाजवळ पोहोचतात, तेव्हा सुंदर ऑरोरा म्हणजेच ध्रुवीय प्रकाश दिसतो. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा : Winter Trekking Destination: नवीन वर्षात पिकनिकला जायचंय? स्वर्गापेक्षाही सुंदर आहेत 'ही' 3 ठिकाणं!)
सूर्यावरील डागांचे स्वरूप आणि तापमान
सूर्य डागांचे तापमान सुमारे 4000 अंश सेल्सियस असते. तर फोटोस्फियरचे तापमान सुमारे 6300 अंश सेल्सियस असते. सूर्य डाग तुलनेने थंड असल्याने ते गडद दिसतात.
सूर्य डाग पाहण्याची सुरक्षित पद्धत
सूर्य डाग पाहण्यासाठी थेट सूर्याकडे पाहणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ते पाहण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे दुर्बिणीचा वापर करून सूर्याची प्रतिमा एखाद्या पृष्ठभागावर प्रोजेक्ट करणे. यासाठी सुरक्षित असलेल्या ग्रहण गॉगल्सचा वापर करणे.
(नक्की वाचा : हिवाळ्यात तोंडातून धुरासारखी सफेद वाफ बाहेर का पडते? 99 टक्के लोकांना महितच नाही यामागचं कारण)
सूर्य डागांचा इतिहास
इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ थॉमस हॅरियट आणि इटालियन खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली हे सूर्य आणि सूर्य डागांचे रेखाटन करणारे पहिले युरोपीय होते. गॅलिलिओने नंतर काळजीपूर्वक निरीक्षणे नोंदवली, ज्यात अम्ब्रा म्हणजे सूर्य डागाचा सर्वात गडद भाग आणि पेनम्ब्रा म्हणजे अम्ब्राभोवतीचा हलका भाग स्पष्टपणे दिसत आहे.