जाहिरात
This Article is From Mar 08, 2024

चिकन-मटण नाही तर शरीर फिट ठेवण्यासाठी 4 गोष्टींचा करा आहारात समावेश

शाकाहारी पदार्थांमध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन नसतात असाही अनेकांचा समज असतो. हे खरं नाही.

चिकन-मटण नाही तर शरीर फिट ठेवण्यासाठी 4 गोष्टींचा करा आहारात समावेश
मुंबई:

High Protein Diet: आपल्या शरीराला प्रोटीनची मोठी गरज असते. चिकन, मटण, अंडीसह नॉनव्हेज पदार्थ हे प्रोटीनचा चांगला सोर्स समजले जातात. पण, ज्या व्यक्ती नॉनव्हेज खात नाहीत त्यांना प्रोटीन कसे मिळणार? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. शाकाहारी पदार्थांमध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन नसतात असाही अनेकांचा समज असतो. हे खरं नाही. शाकाहारी पदार्थांमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यानं शरीराची योग्य वाढ होते. त्याचबरोबर ते तुम्हाला फ्रेश ठेवतात.

डेअरी प्रोडक्टमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीनचा समावेश असतो. त्यामुळे शाकाहारी व्यक्तींनी डेअरीतील 4 महत्त्वांच्या प्रोडक्टसचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या निर्णाण होतात. केस गळतात, त्वचा आणि नखं कमकुवत होते, थकवा, प्रतिकारशक्ती कमी होणे या सर्व अडचणींचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलनही बिघडू शकते. त्यामुळे कोणत्या शाकाहारी पदार्थांमुळे तुम्हाला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळू शकते ते पाहूया

दूध 

निरोगी आरोग्यासाठी दूध हा सर्वात चांगला पर्याय आहे. दिवसभरात दोन ग्लास दूध निश्चितपणे प्यायला हवे. 100 ग्रॅम दूधामध्ये (Milk) जवळपास 3.2 ग्रॅम प्रोटीनचा समावेश असतो.

दूधामधील प्रोटीन आणि अमीनो एसिड्स शरीरासाठी आवश्यक असतात. हाडांची मजबूती, स्नायूंची निर्मिती तसंच मानसिक आरोग्यासाठीही दूध फायद्याचे आहे. प्रोटीनशिवाय कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाचाही दूधामध्ये समावेश असतो.  

कॉटेज चीज

100 ग्रॅम कॉटेज चीजमध्ये 11 ग्रॅम प्रोटीन असते. हा आपल्या शरीरातील प्रोटीनचा एक चांगला सोर्स आहे. यामध्ये प्रोटीनसह ड जीवनसत्व, कॅल्शियम आणि अन्य पोषक तत्वांचाही समावेश असतो. त्यामुळे शरीरातील हाडं विकसित होण्यास मदत मिळते. मांसाहार न करणाऱ्या व्यक्तींना प्रोटीन मिळवण्याचा हा सर्वात चांगला पर्याय आहे. हे कोणत्याही चिकनपेक्षा कमी नाही. 

दही

साधारणपणे 8 औंस (227 ग्रॅम) दह्यात 12 ग्रॅम प्रोटीन असते. दह्यामुळे स्नायूंना शक्ती मिळते. त्याचबरोबर वजन कमी होण्यासाठीही फायदा होतो. दह्यात कॅल्शियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे आपली हाडं मजबूत होण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या डाएटमध्ये दह्याचा समावेश नक्की असायला हवा.

ताक

ताकामध्ये कॅल्शियमसह प्रोटीन, प्रोटॅशियम आणि ब जीवनसत्तांवाचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. शरीर मजबूत करण्याबरोबरच पचन शक्तीमध्ये सुधारणा करण्यासाठीही ताक उपयोगाचे आहे.  उन्हाळ्यात तुम्ही दोन ग्लास ताक पिऊ शकता. त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.

टीप: ही सामान्य ज्ञानावर आधारित माहिती आहे. यामध्ये कोणत्याही रोगांवरील उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टर किंवा एक्स्पर्टचा सल्ला घ्यावा. NDTV मराठी या माहितीसाठी जबाबदार नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com