जाहिरात

Gen Z सीमा आनंद यांना का सर्च करतायेत; कोण आहेत त्या? गुगलवर सर्वाधिक सर्च केल्याचा मोडला रेकॉर्ड

Seema Anand: Gen Z, सीमा आनंद को इसलिए सर्च कर रहे हैं, क्योंकि वह कामसूत्र, रिश्ते और अंतरंगता जैसे वर्जित विषयों पर खुलकर और निडर होकर बात करती हैं.

Gen Z सीमा आनंद यांना का सर्च करतायेत; कोण आहेत त्या? गुगलवर सर्वाधिक सर्च केल्याचा मोडला रेकॉर्ड
सीमा आनंद कोण आहेत?
Social Media

Who is Seema Anand ? सध्या मोठ्या संख्येने लोक इंग्लंडमध्ये राहणाऱ्या पौराणिक कथाकार, लेखिका आणि सेक्स-पॉजिटिव एज्युकेटर सीमा आनंद यांच्याबद्दल सर्च करीत आहेत. त्यांचे काही AI-जनरेटेड आक्षेपार्ह फोटो ऑनलाइन व्हायरल झाल्यामुळे त्या ट्रेंडिंगमध्ये आल्या आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे. 

सीमा आनंद यांना Gen Z का सर्च करीत आहे?

सीमा आनंद या सेक्स, नातेसंबंध यांसारख्या वर्ज्य विषयांवर मोकळेपणाने आणि निडर होऊन बोलतात. ज्यामुळे त्या सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. ज्या विषयांवर बोलणं समाज निषिद्ध मानतो, अशा विषयांवर त्या बोलतात. ही बाब Gen Z ला आकर्षित करीत असावी असं म्हटलं जातं. त्या ६३ वर्षांच्या आहेत. त्यांच्या आत्मविश्वास लोकांना भावतो. त्या खुलेपणाने कारणमीमांसा देत आपली मतं मांडतात. 

सीमा आनंद कोण आहेत?

सीमा आनंद एक लेखिका, प्रोफेशनल स्टोरीटेलर आणि पौराणिक कथा विशेतज्ञ आहेत. त्या मनोविज्ञान आणि भारतीय प्राचीन ग्रंथ उदा. कामसूत्राचा उपयोग करीत नातं आणि शरीरसंबंधाबद्दल बोलतात. त्या पॉडकास्ट, सोशल मिडिया आणि आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून लोकांशी जोडल्या जातात. सीमा आनंद यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते शरीरसंबंधाला केवळ शरीर क्रिया मानत नाहीत. त्यांचं चर्चिलेलं पुस्तक The Arts of Seduction मध्ये त्यांनी म्हटलंय, की कामवासना वास्तवत: मानवी संबंध, आत्म-प्रेम आणि ब्रम्हांडाच्या उर्जेचा विस्तार आहे. त्या भगवत् गीता आणि प्राचीन गोष्टींच्या माध्यमातून अनेक विषय सोपे करून  सांगतात. त्या पुढे सांगतात, आनंद एक शक्ती आहे. जी आपल्या पूर्वजांनी नेहमी स्वीकारली. मात्र आधुनिक समाजात याला वर्ज्यित करण्यात आलं आहे.   


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com