
Home Remedies For Cold-Cough: कफ सिरपमुळे झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर, आता अनेक लोक सर्दी-खोकल्यासाठी औषधे घेण्यास कचरत आहेत. सध्या बदलत्या हवामानामुळे सर्दी आणि खोकला होणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला नियमित औषधे टाळून नैसर्गिक उपायांनी आराम मिळवायचा असेल, तर आयुर्वेदातील काही सोपे आणि प्रभावी उपाय निश्चितच उपयुक्त ठरतील. हे उपाय केवळ खोकल्यापासून आराम देणार नाहीत, तर तुमची रोगप्रतिकारशक्ती (इम्यून सिस्टम) देखील मजबूत करतील. हे उपचार तुम्हाला घरबसल्या करता येतील. हे घरगुती उपाय नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील.
खोकला आणि सर्दीवर 5 रामबाण घरगुती उपाय
1. आले आणि मधाचे मिश्रण (Ginger and Honey)
आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. तर मध घशाला आराम देतो. 1 चमचा आल्याचा रस आणि त्यात 1 चमचा मध मिसळून हे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. यामुळे घसादुखी आणि खोकला लवकर कमी होतो.
2. तुळस आणि काळी मिरीचा चहा (Tulsi and Black Pepper Tea)
तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. काळी मिरी कफ बाहेर काढण्यास मदत करते. 5 ते 6 तुळशीची पाने, 2 ते 3 काळी मिरी बारीक करून 1 कप पाण्यात उकळवा. गाळून गरम प्या.
3. लसूण (Garlic)
लसणात अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे संसर्गाशी लढतात. 1 लसणाची पाकळी कच्ची चावा किंवा तुपात भाजून खा. हा उपाय रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
4. मिठाच्या पाण्याने गुळण्या (Salt Water Gargle)
घसादुखी आणि सूज कमी करण्यासाठी हा अतिशय जुना आणि प्रभावी उपाय आहे. 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या करा.
5. हळद मिसळलेले दूध (Turmeric Milk)
हळदीमध्ये अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत आणि दूध शरीराला उष्णता देते. 1 ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे खोकला शांत होऊन चांगली झोप लागते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world