जाहिरात

Nagpur News: मेंदूज्वर सदृश्य आजाराने नागपुरात खळबळ! 10 बालकांचा मृत्यू; पालकांनी काय काळजी घ्यावी?

Nagpur Children Death Cough Syrup News: . आतापर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दहा बालकांचा बळी या संशयित आजाराने घेतला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Nagpur News: मेंदूज्वर सदृश्य आजाराने नागपुरात खळबळ! 10 बालकांचा मृत्यू; पालकांनी काय काळजी घ्यावी?

समीर सावंत, प्रतिनिधी:

Nagpur children are dying due to the administration of cough syrup:  महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात सध्या संशयित मेंदूज्वर (Suspected Encephalitis/Brain Fever) या आजाराने गंभीर रूप धारण केले आहे. आतापर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दहा बालकांचा बळी या संशयित आजाराने घेतला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, कारण या बालकांच्या आजाराचे मूळ संशयित कफ सिरपमध्ये (Cough Syrup) असण्याची भीती व्यक्त होत आहे.

नागपूरमध्ये 10 बालकांचा मृत्यू; १४ बालकांवर उपचार सुरु

सध्या नागपुरातील विविध रुग्णालयांत सध्या सुमारे चौदा बालके संशयित मेंदूज्वर आजाराने दाखल असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.  यातील अनेक रुग्ण हे मध्य प्रदेश आणि राजस्थान या शेजारील राज्यांमधील आहेत. दाखल बालकांपैकी बहुतांश रुग्ण डायलिसिसवर (Dialysis) किंवा व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहेत. एकट्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (GMC) सहा बाल रुग्ण असून, त्यापैकी चार व्हेंटिलेटरवर तर दोन डायलिसिसवर उपचार घेत आहेत.

 या प्रकरणात एका पालकांच्या बोलण्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या दोन वर्षीय वेदांश पवार याचे वडील कपिल पवार यांनी NDTV मराठीशी बोलताना सांगितले की, वेदांशला चार दिवस खोकल्याचे सिरप दिल्यानंतर त्याची लघवी पूर्णपणे बंद झाली. त्यांनी आपल्या मुलाला कोल्ड्रिफ सिरप (Coldriff Syrup) दिले होते. 

Cough Syrup Incident : कप सिरपमुळे 11 लहान मुलांचा मृत्यू! पोलिसांनी डॉक्टरला केली अटक

अन्न व औषध प्रशासन अलर्ट मोडवर

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये संशयित कफ सिरपमुळे बालकांच्या मृत्यूच्या घटना घडल्याने नागपुरातील अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) तातडीने अलर्ट मोडवर आला आहे. विभागाने शहरातील काही स्टॉकिस्टकडे (Stockists) धाव घेत कफ सिरपच्या साठ्याची पाहणी केली. एका स्टॉकिस्टकडे असलेल्या कफ सिरपबद्दल अधिकाऱ्यांच्या मनात शंका आहे.  

संशयित कफ सिरपची विक्री होऊन ते बाजारात वितरित होण्यापूर्वीच, FDA ने संबंधित स्टॉकिस्टला त्याच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. या कफ सिरपचे नमुने (Samples) घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या सिरपमध्ये कोणते विषारी घटक आहेत, याचा अहवाल येईपर्यंत स्टॉकिस्टकडून त्याची विक्री होऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच FDA पुढील कठोर पाऊल उचलणार आहे.

डॉक्टरांचे पालकांना आवाहन|  Cough Syrup Important Instructions To Parents 

नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या: कोणताही त्रास असेल, तर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रत्येक ताप, सर्दी किंवा खोकला एकसारखा नसतो. चुकीच्या औषधांमुळे त्रास वाढू शकतो.

औषधाचा योग्य डोस द्या: पालकांनी स्वतःहून औषधे ठरवू नयेत आणि औषधाचा योग्य डोस (Proper Dose) द्यावा. लहान बाळांसाठी औषधांचे डोस त्यांच्या वजनानुसार (According to Weight) ठरलेले असतात. डोस कमी-जास्त झाल्यास त्रास होऊ शकतो.

व्हायरल इन्फेक्शन आणि कफ सिरप: लहान मुलांमध्ये होणारे बहुतेक संसर्ग व्हायरल (Viral) स्वरूपाचे असतात. अशा परिस्थितीत केवळ सपोर्ट ट्रीटमेंट (विश्रांती, योग्य पोषण आणि हायड्रेशन) पुरेशी असते. अनेकदा ९०% केसेसमध्ये औषधांशिवाय आराम मिळतो.

कफ सिरप देणे हेच एकमेव उपाय नाही, अनेकदा सपोर्ट ट्रीटमेंटनेच हे आजार बरे होतात. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com