Shattila Ekadashi 2026 Vrat: षट्तिला एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी, नियम, पारण वेळ आणि धार्मिक महत्त्व वाचा

Shattila Ekadashi 2026 Vrat: षट्तिला एकादशीचे व्रत कसे करावे, कोणते नियम पाळावे, यासह सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
Shattila Ekadashi 2026: षटतिला एकादशी व्रत की पूजा विधि एवं नियम
NDTV

Shattila Ekadashi Vrat 2026: सनातन परंपरेमध्ये प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. कारण ही तिथी भगवान श्री विष्णू यांचे जप-तप आणि व्रतासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. आज षट्तिला एकादशी आहे, या एकादशीचे व्रत कसे करावे आणि पूजा कशी करावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

षट्तिला एकादशी 2026 तिथी आणि पारणाचा मुहूर्त | Shattila Ekadashi 2026 Tithi

षट्तिला एकादशी तिथी 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.17 वाजता सुरू झाली असून 14 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 5.52 वाजता तिथी समाप्त होणार आहे. तर व्रताचे पारण 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.15 वाजेपासून ते सकाळी 9.28 वाजेदरम्यान करावे. 

षट्तिला एकादशी व्रताची पूजा कशी करावी? |Shattila Ekadashi 2026 Puja 

  • हिंदू धर्मात भगवान श्री हरि यांची कृपा मिळवण्यासाठी षट्तिला एकादशी व्रत करताना सर्वप्रथम पहाटे उठून स्नान-ध्यान करावे.
  • यानंतर चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. 
  • पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाचे चंदन, केशर, पिवळ्या रंगाचे गोड पदार्थ, पिवळ्या रंगाची फळं, शुद्ध तुपाची वात असलेला दिवा, धूप अर्पण करावे.
  • यानंतर एकादशी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. 
  • पूजेच्या शेवटी भगवान विष्णूंची आरती करावी. 
  • संपूर्ण दिवस नियम आणि संयम पाळून व्रत करावे. 
  • दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तात पारण करावे.

षट्तिला एकादशी व्रताचे धार्मिक महत्त्व

  • सनातन परंपरेमध्ये एकादशी व्रत सुख-समृद्धी देणारे मानले जाते. 
  • मान्यतेनुसार नियमपूर्वक एकादशी व्रत केल्यास भाविकाचे सर्व पाप आणि दोष नष्ट होतीत, अक्षय पुण्य प्राप्त होईल. 
  • षट्तिला व्रताचे पालन केल्यास अश्वमेध यज्ञासारखे पुण्यफळ मिळते, असेही म्हणतात. 
  • षट्तिला एकादशीचे संपूर्ण पुण्य मिळवण्यासाठी आज भगवान श्री हरि यांना तिळापासून तयार केलेले नैवेद्य अर्पण करावे तसेच तिळ आणि गूळ दान करावा.

(नक्की वाचा: Shattila Ekadashi 2026: मकरसंक्रांती आणि षट्तिला एकादशीचा दुर्मीळ योग, तिळगुळाचे सेवन करावे का? व्रत कोणी करावे?)

षट्तिला एकादशी व्रताचे नियम | Shattila Ekadashi 2026 Vrat

  • षट्तिला एकादशीच्या दिवशी स्नानापूर्वी तिळाच्या तेलाने शरीराचा मसाज करावा किंवा तिळाचे उटणे लावावे. 
  • शक्य असल्यास गंगास्नान करावे. जर जलतीर्थावर जाणे शक्य नसेल, तर घरच्या पाण्यात तीळ, थोडीशी हळद आणि गंगाजल मिक्स करून स्नान करावे.
  • तसेच पूजेमध्ये तिळापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा आणि हवन सामग्रीमध्ये तिळाचा समावेश करावा. 

Advertisement

(नक्की वाचा: Shattila Ekadashi 2026: षट्तिला एकादशीचा शुभ मुहूर्त, पारण वेळ, तिथी, पूजा विधी, व्रत कथा जाणून घ्या सविस्तर माहिती)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)