जाहिरात

Shattila Ekadashi 2026: षट्तिला एकादशीचा शुभ मुहूर्त, पारण वेळ, तिथी, पूजा विधी, व्रत कथा जाणून घ्या सविस्तर

Shattila Ekadashi 2026: हिंदू धर्मामध्ये षट्तिला एकादशीचे व्रत जीवनातील सर्व दोष दूर करून इच्छा पूर्ण करणारे मानले जाते. या व्रतासंदर्भात सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया...

Shattila Ekadashi 2026: षट्तिला एकादशीचा शुभ मुहूर्त, पारण वेळ, तिथी, पूजा विधी, व्रत कथा जाणून घ्या सविस्तर
"Shattila Ekadashi 2026: षट्तिला एकादशी व्रत माहितीये का?"
Canva
  • षट्तिला एकादशी व्रताचे हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे.
  • षट्तिला एकादशीला भगवान विष्णूंची विधीवत पूजा करणे आणि तिळांचे सहा प्रकारे उपयोग करण्याची परंपरा आहे.
  • षट्तिला एकादशी व्रताचा प्रमुख उपाय म्हणजे तिळांचे दान करणे होय.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Shattila Ekadashi 2026 Shubh Muhurat: हिंदू धर्मामध्ये जगाचे पालनकर्ते मानले जाणारे भगवान श्री विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत करणं अतिशय पुण्यदायी मानले जाते. हे व्रत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला आल्यास त्याचे महत्त्व अधिक वाढते. हिंदू धर्मामध्ये षट्तिला एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधीवत पूजा केल्यास मोठा आशीर्वाद मिळतो, असे म्हणतात. मान्यतेनुसार या दिवशी तिळांचा सहा प्रकारे उपयोग केला जातो, म्हणूनच या एकादशीला "षटतिला एकादशी" असे म्हणतात. षट्तिला एकादशी शुभ मुहूर्त, तिथीसह व्रताची कथा जाणून घेऊया...

षट्तिला एकादशी 2026 तिथी वेळ | Shattila Ekadashi 2026 Tithi Time

  • षट्तिला एकादशी तिथी आरंभ वेळ : 13 जानेवारी 2026 दुपारी 3.17 वाजता
  • षट्तिला एकादशी तिथी समाप्त वेळ : 14 जानेवारी 2026 संध्याकाळी 5.52 वाजता
  • पंचांगानुसार षट्तिला एकादशीचे व्रत 14 जानेवारी 2026 रोजी केले जाईल.

षट्तिला एकादशी 2026 व्रत पारण शुभ मुहूर्त | Shattila Ekadashi 2026 Paran Shubh Muhurat

पारण शुभ मुहूर्त 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.15 वाजेपासून ते सकाळी 9.28 वाजेपर्यंत आहे. 

षट्तिला एकादशी व्रत पूजा विधी | Shattila Ekadashi 2026 Vrat Puja Vidhi

  • षट्तिला एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून तिळांचे उटणे लावून स्नान करावे. 
  • त्यानंतर तीळ मिसळलेल्या पाण्यात थोडे गंगाजल घालून स्नान करावे. 
  • शक्य असल्यास गंगास्नान करून या व्रताचे विशेष पुण्य प्राप्त करावे.
  • मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधीवत पूजा करणं फलदायी ठरेल.
  • तिळापासून तयार केलेल्या पदार्थांचे नैवेद्य तुळशीच्या पानासह अर्पण करावा. 
  • शक्य असल्यास ब्राह्मणांना भोजन द्यावे. 
  • षट्तिला एकादशी व्रतामध्ये तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व आहे, म्हणून आपल्या क्षमतेनुसार विशेषतः तिळांचे दान करावे.
षट्तिला एकादशी व्रताची कथा | Shattila Ekadashi Vrat Katha

पौराणिक कथेनुसार, एकदा काशी नगरीत एक अतिशय गरीब माणूस राहत होता. तो जंगलातून लाकूड तोडून आपली उपजीविका करत असे. अनेकदा लाकूड विकले गेले नाही तर तो आपल्या मुलांसह उपाशी झोपत असे. एक दिवस तो लाकूड तोडून शहराकडे जात असताना एका व्यक्तीने त्याची सर्व लाकडे खरेदी केली. लाकूड संबंधित व्यक्तीच्या घरी पोहोचवायला गेल्यानंतर त्याला तेथे कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचे दिसले. लाकडू विकत घेणाऱ्या व्यक्तीला विचारल्यानंतर समजले की षट्तिला एकादशी व्रताची तयारी सुरू आहे. तेव्हा त्या लाकूडतोड्याने त्यांना विचारले की हे व्रत केल्यास कोणते लाभ मिळतात. यावर त्यांनी सांगितलं की, या व्रताच्या पुण्यामुळे धन-संपत्ती वाढते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते. व्रताची संपूर्ण विधी समजून घेतल्यानंतर त्या गरीब लाकूडतोड्याने आपल्या पत्नीसमवेत षट्तिला एकादशीचे व्रत विधीवत आणि तिळाचे दान केले. त्या गरीब व्यक्तीने सलग एक वर्ष एकादशीचे व्रत केले. या पुण्याच्या प्रभावामुळे तो काशी नगरीतील सर्वात श्रीमंत सेठ बनला, असे म्हणतात.

Happy Makar Sankranti 2026 Wishes,Quotes: तिळगुळासारखा गोडवा तुमच्या जीवनात कायम राहो, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(नक्की वाचा: Happy Makar Sankranti 2026 Wishes,Quotes: तिळगुळासारखा गोडवा तुमच्या जीवनात कायम राहो, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!)

    षट्तिला एकादशी व्रताची दुसरी कथा | Shattila Ekadashi Vrat Katha

    एक ब्राह्मण महिला नियमितपणे पूजा-पाठ करत असे, पण ती कधीही दान करत नसे. तिने आयुष्यात कधीच कोणाला दान दिले नव्हते. भगवान विष्णू तिच्या पूजेमुळे प्रसन्न होते, पण त्यांना चिंता वाटत होती की पूजा-पठणाच्या पुण्यामुळे तिला वैकुंठलोक मिळेल, पण अन्नदान न केल्यामुळे तिला तेथे भोजन कसे मिळेल? हीच चिंता मनात ठेवून एक दिवस भगवान विष्णू भिक्षा मागण्यासाठी तिच्याकडे गेले. त्यांनी भिक्षा मागितली असता त्या ब्राह्मण महिलेने अन्न न देता त्यांना एक दगड दिला. काही काळानंतर त्या ब्राह्मण महिलेचे निधन झाले आणि तिला वैकुंठलोक प्राप्त झाला. पण तेथे तिला अन्न मिळाले नाही. दुःखी होऊन तिने श्रीहरिंजवळ जाऊन कारण विचारले. तेव्हा भगवान विष्णूंनी तिला तिची चूक सांगितली आणि उपायही सांगितला. वैकुंठलोकातील देवतांकडून षट्तिला एकादशी व्रताची माहिती घेऊन ते व्रत कर आणि पूजेनंतर तिळांचे दान करा, हा उपाय भगवान विष्णूंनी तिला सांगितला. त्यामुळे तुझे सर्व पाप आणि दोष दूर होतील आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ब्राह्मण महिलेने हा उपाय केला आणि तिच्या सर्व समस्या दूर झाल्या, अशीही कथा आहे.  

    Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण

    (नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण)

    (Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

    Listen to the latest songs, only on JioSaavn.com