जाहिरात

Shattila Ekadashi 2026: मकरसंक्रांती व षट्तिला एकादशीचा दुर्मीळ योग, तिळगुळाचे सेवन करावे का? व्रत कोणी करावे?

Shattila Ekadashi 2026: यंदा मकरसंक्रांती आणि षट्तिला एकादशी एकाच दिवशी आहे. हा दुर्मीळ योग जुळून आल्याने काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया...

Shattila Ekadashi 2026: मकरसंक्रांती व षट्तिला एकादशीचा दुर्मीळ योग, तिळगुळाचे सेवन करावे का? व्रत कोणी करावे?
"Shattila Ekadashi 2026: षट्तिला एकादशीला तिळगुळाचे सेवन करावे का?"
Canva

- श्रीकेतन कुलकर्णी, ज्योतिषाचार्य
Shattila Ekadashi 2026:
वर्ष 2026मध्ये मकरसंक्रांती सण आणि षट्तिला एकादशी एकाच दिवशी आल्याने नागरिकांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पण गोंधळून जाऊन का, शास्त्रानुसार माहिती सविस्तर जाणून घेऊया... 

षट्तिला एकादशी कधी आहे? | When Is Shattila Ekadashi 2026

14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती आणि षट्तिला एकादशी असा दुर्मीळ तसेच पवित्र योग जुळून आलाय.
सणाचा आनंद आणि उपवासाची शिस्त या दोन्ही गोष्टींमुळे भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

षट्तिला एकादशी 2026 तिथी वेळ | Shattila Ekadashi 2026 Tithi Time

षट्तिला एकादशी तिथी 13 जानेवारी 2026 दुपारी 3.17 वाजता सुरू होत असून 14 जानेवारी 2026 संध्याकाळी 5.52 वाजता तिथी समाप्त होतेय. पंचांगानुसार षट्तिला एकादशीचे व्रत 14 जानेवारी 2026 रोजी केले जाईल.

षट्तिला एकादशी 2026 व्रत पारण शुभ मुहूर्त | Shattila Ekadashi 2026 Paran Shubh Muhurat

एकादशी व्रताचे पारण 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.15 वाजेपासून ते सकाळी 9.28 वाजेपर्यंत करावे. 

धर्मशास्त्राच्या आधारे महत्त्वाची माहिती जाणून घेऊया...

1.देवाला उपवास नसतो!
उपवास हा मानवासाठी आहे, ईश्वरासाठी नाही.
देव नित्यतृप्त आहे. म्हणून संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवाला अर्पण करणे पूर्णतः योग्य आणि शास्त्रसंमत आहे.
परंपरेप्रमाणे गोड नैवेद्य अवश्य अर्पण करावा.

2. उपवास कोणी करावा?
ज्यांचा एकादशीचा नित्य नियम (वारी) आहे, त्यांनीच उपवास करावा.
ज्यांचा उपवास नाही, त्यांनी कोणताही दोष किंवा भीती न बाळगता आनंदाने पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा आणि मकर संक्रांती साजरी करावी.

3. उपवास करणाऱ्यांनी काय करावे?
उपवास असलेल्या भाविकांनी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा.
मात्र तो प्रसाद त्या दिवशी स्वतः ग्रहण करू नये, प्रसाद द्वादशीला पारणं करताना घ्यावा, हेच खरे शास्त्रसंमत आचरण आहे.

Shattila Ekadashi 2026: षट्तिला एकादशीचा शुभ मुहूर्त, पारण वेळ, तिथी, पूजा विधी, व्रत कथा जाणून घ्या सविस्तर माहिती

(नक्की वाचा: Shattila Ekadashi 2026: षट्तिला एकादशीचा शुभ मुहूर्त, पारण वेळ, तिथी, पूजा विधी, व्रत कथा जाणून घ्या सविस्तर माहिती)

4. तिळगुळाचे सेवन करावे का? 
होय! 
तीळ आणि गूळ उपवासाला चालतात.
विशेष म्हणजे ही एकादशीच "षट्तिला एकादशी" असल्यामुळे तिळाचे सेवन आणि तीळदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.

थोडक्यात सारांश:
देवाला नैवेद्य पुरणपोळीचा, भक्ताला लाभ भाव-भक्तीचा.

हा हरि-भास्कर योग आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो,  हीच श्रीहरीचरणी प्रार्थना. 

Happy Makar Sankranti 2026 Wishes,Quotes: तिळगुळासारखा गोडवा तुमच्या जीवनात कायम राहो, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(नक्की वाचा: Happy Makar Sankranti 2026 Wishes,Quotes: तिळगुळासारखा गोडवा तुमच्या जीवनात कायम राहो, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com