- Black powder on onions may be a fungus called Aspergillus niger
- The fungus grows due to warm, humid conditions and poor storage ventilation
- Store onions in mesh baskets for ventilation and buy fresh instead of stocking up
Onion Black Fungus: कांद्याच्या बाहेरील थरावर आढळणाऱ्या काळ्या पावडरसारख्या पदार्थाबाबत सध्या सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात आहे. यावरून आरोग्याच्या सुरक्षेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. हा काळा पदार्थ माती नसून, अस्पर्जिलस नायगर नावाचा एक प्रकारचा बुरशीचा प्रकार आहे. डॉक्टर नंदिता अय्यर यांच्या X वरील पोस्टमुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. ज्यात त्यांनी बाजारात आणि डिलिव्हरी ॲप्सवर स्वच्छ कांदा मिळणे किती दुर्मिळ झाले आहे, हे सांगितले आहे.
काय आहे डॉक्टरची पोस्ट?
डॉ. नंदिता अय्यर यांनी त्यांच्या व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, "या क्षणाला, काळ्या बुरशीने न माखलेला कांदा मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भाजी बाजारात एक चाकू घेऊन जाणे, तो सोलणे, गुणवत्ता तपासणे आणि मगच खरेदी करणे." त्यांनी सर्व डिलिव्हरी ॲप्स आणि सुपरमार्केटमधून कांदे मागवले, पण त्यांना एकही 'स्वच्छ कांदा' मिळाला नसल्याचे त्यांनी नमूद केले.
At this point, the only way to get onions that are not coated with black fungus is to take a paring knife to the vegetable market, peel, quality check and then buy. I've ordered from every single app/ supermarket and I'm sorry to say that I am yet to come across a single onion… pic.twitter.com/inWmX2F34W
— Dr Nandita Iyer (@saffrontrail) November 12, 2025
अनेक X युझर्सनी समान अडचणी येत असल्याचे मान्य केले आणि काही लोकांनी डिलिव्हरी ॲप्सऐवजी स्थानिक बाजारातून कांदे घेण्याचा सल्ला दिला. ज्याला डॉक्टरनेही दुजोरा दिला. ही समस्या नवी नसली तरी, अलीकडे अशा कांद्यांची संख्या खूप वाढली आहे, असं डॉ. नंदिता यांनी सांगितले आहे.
(नक्की वाचा- Dinner Habit: फक्त एक आठवडा रात्री 7 वाजता जेवण करा; शरीरात होणारे 6 बदल पाहून चकीत व्हाल!)
Facts! At this point, buying onions needs PPE kit, magnifying glass and a quality-check lab. Clean onions have become a myth.
— Dr-karthikeyan (@karthc1) November 12, 2025
Go to your local mandi...🙏 please put effort if you want to consume better...local farmers bring quality stuff there...supermarkets and online stores are horrible
— kushagra kashyap (@kushagrakashyap) November 12, 2025
I think the root cause is that the dealers who purchase the yield from the farmers have been historically hoarding the onions to control the market price. Sitting too long in improper storage conditions is the key reason imo so it's not really going to change wherever u get from
— Vithal Kadiam (@kvgraphy1) November 12, 2025
It's due to the humid climate and how they're stored in warehouses and dark stores. But I've always heard they're harmless as long as you wash them away!
— Rajath DM 😎 (@rajathdm) November 13, 2025
It's a real shame when the basic things we count on are constantly letting us down. We just want to cook a decent meal without having to become produce inspectors first, you know? Hopefully, things start looking up soon for everyone trying to stock their pantry.
— Gelson Luz (@gelsonluz) November 13, 2025
this is so common now in onions. I have started buying from local market but sometimes they also have similar kind of onions.
— Nidhi Singh (@anuridhisingh) November 13, 2025
I can't find onions without them either. So I usually remove the outermost layer completely, wash well and then cut the onion.
— aravv (@aravkanth) November 13, 2025
कांद्यावर काळी बुरशी का येते?
यापूर्वी डॉ. नंदिता अय्यर यांनी अस्पर्जिलस नायगर या बुरशीबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी स्पष्ट केले होते की, ही बुरशी उबदार, दमट जागेत वाढते आणि ती फळे तसेच बाथरूमच्या भिंतींवरही आढळते. ही बुरशी वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे दमट हवामान, साठवणुकीत खराब व्हेटिंलेशन, वेअरहाऊसमध्ये कांदा जास्त दिवस शेल्फवर ठेवणे आणि ई कॉमर्स ब्रँडच्या दमट आणि अंधाऱ्या दुकानांमध्ये त्यांची साठवणूक केली जाते.
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
काय काळजी कशी घ्यावी?
- जर काळा पदार्थ फक्त कांद्याच्या सर्वात बाहेरील थरांवर असेल, तर काळजीपूर्वक ते थर सोलून टाकावेत, कांदा स्वच्छ धुवावा आणि नंतर तो शिजवून खाण्यास हरकत नाही.
- जर काळा पदार्थ अधिक थरांवर आढळला, तर स्वच्छ, गुलाबी-पांढरा भाग मिळेपर्यंत सोलणे सुरू ठेवावे.
- जर कांद्याला दमट वास येत असेल किंवा त्याचा पोत बुळबुळीत झाला असेल, तर तो तात्काळ फेकून द्यावा. कारण ही बुरशी कधीकधी विषारी पदार्थ निर्माण करू शकते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
स्वच्छता कशी कराल?
बुरशी असलेला कांदा कापल्यानंतर हात, चाकू आणि चॉपिंग बोर्ड साबणाने स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून काळ्या कणांमुळे इतर अन्नपदार्थ दूषित होणार नाहीत. डॉक्टर जाळीच्या टोपल्यांमध्ये कांदे ठेवण्याचा सल्ला देतात. प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा बंद डब्यांमध्ये कांदे ठेवू नये. मोठ्या प्रमाणात साठवणूक न करता, आवश्यकतेनुसार ताजे कांदे खरेदी करावे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world