Skin Care : त्वचेच्या काळजीसाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करावं का? तज्ज्ञांनी सांगितलं...

Skincare Advice : इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटी नवनवीन ब्युटी केअर प्रोडक्टचा प्रचार करत असल्याने त्यात अडकणे सोपे आहे. मात्र इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटींवर अंध विश्वास ठेवण्यापेक्षा जरा थांबून स्वतःला विचारणे गरजेचे आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. आज देशात अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर अनेक कंपन्यांची नजर असते. आपल्या प्रोडक्ट्सची मार्केटिंग इन्फ्लुएन्सर्सकडून करुन घेणे हा सोपा मार्ग आहे. मात्र काही विशिष्ट गोष्टीसाठी इन्फ्लुएन्सर्सचा सल्ला ऐकणे चुकीचे ठरु शकते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्कीनकेअरचा विषय येतो त्यावेळी विशेष काळजी घेणे गरजेचं असतं. इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटी नवनवीन ब्युटी केअर प्रोडक्टचा प्रचार करत असल्याने त्यात अडकणे सोपे आहे. मात्र इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटींवर अंध विश्वास ठेवण्यापेक्षा जरा थांबून स्वतःला विचारणे गरजेचे आहे.

(नक्की वाचा-  Cervical Spondylosis Causes : दिवसभर बसून काम करताय? होईल हा गंभीर आजार)

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. किरण यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्वचेच्या काळजीचा ज्यावेळी प्रश्न येतो तेव्हा इन्फ्लुएन्सर्स नाहीतर त्वचारोगतज्ज्ञांवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये डॉ. किरण यांनी म्हटलं की, इन्फ्लुएन्सर्सकडून मिळणारा स्किनकेअर सल्ला प्रत्येकासाठी फायदेशीर ठरू शकत नाही. एका व्यक्तीसाठी जे प्रोडक्ट काम करते ते दुसऱ्यासाठी काम करू शकतं असं नाही. कारण स्कीनकेअरचे परिणाम त्वचेच्या प्रकारानुसार बदलतात.

(नक्की वाचा: Health Tips : चिकन, मटनपेक्षा देखील 'या' डाळीमध्ये जास्त प्रोटीन, 6 फायद्यांसाठी करा आहारात समावेश)

डॉ. किरण यांनी पुढे प्रश्न विचारला की, "स्किनकेअरसाठी डॉक्टरांवर विश्वास ठेवाल की एखाद्या इन्फ्लुएन्सरवर?" यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं. "एखादा इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो की, चेहऱ्यावर लिंबू लावा. त्यामुळे स्कीनवरील टॅनिंगचं प्रमाण कमी होईल . पण डॉक्टर म्हणू शकतात की, 'लिंबामुळे फोटोअ‍ॅलर्जी, पिगमेंटेशन वाढवू शकते, तसेच पुरळ देखील येऊ शकतात.'" 

Advertisement

डॉक्टरकडे स्कीनकेअर टिप्स देण्यासाठी ज्ञान आहे. एखादा इन्फ्लुएन्सर तुमच्या शरीरावर जळू लावा असाही सल्ला देऊ शकतो. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होईल. मात्र डॉक्टर याविरुद्ध सल्ला देतील. "ते घाणेरडे आहे. जळू फक्त काही विशिष्ट आरोग्य परिस्थितींमध्येच वापरले जातात. जळूच्या वापराने तुमच्या त्वचेला दीर्घकालीन फायदा होईल असा कोणताही डेटा नाही. 

(नक्की वाचा : Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून नक्कीच होऊ शकतो बचाव, दरवर्षी न चुकता करा हे काम)

डॉक्टरांकडे अभ्यास, डेटा आणि वैज्ञानिक ज्ञानाचा अनुभव आहे. मात्र इन्फ्लुएन्सर त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स शेअर करू शकतात. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यासारखे नाही. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्लाचा फायदेशीर ठरेल, असं डॉ. किरण यांनी म्हटलं. 

Advertisement