जाहिरात

Health Tips : चिकन, मटनपेक्षा देखील 'या' डाळीमध्ये जास्त प्रोटीन, 6 फायद्यांसाठी करा आहारात समावेश

Health Tips : चिकन, मटनपेक्षा देखील 'या' डाळीमध्ये जास्त प्रोटीन, 6 फायद्यांसाठी करा आहारात समावेश
मुंबई:

Urad Dal Benefits In Marathi: डाळीला प्रोटीनचा खजिना मानले जाते. रोज एक वाटी डाळ खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला उडीद डाळीचे फायदे सांगणार आहोत. त्याला काळी डाळ असंही म्हंटलं जातं. उडद दाळीचे सेवन फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. या डाळीमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमीन बी कॉम्प्लेक्स, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस,  फोलेट असे अनेक गुणधर्म आढळतात, ज्याचा शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तर कोणत्या लोकांनी या डाळीचे सेवन केले पाहिजे ते पाहूया

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पचनासाठी

उडदाच्या डाळीमध्ये उच्च फायबर असते जे पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देण्यास मदत करते. तुम्हाला पचनाची समस्या असेल तर तुम्ही या डाळीचे सेवन करू शकता.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: iStock

हृदयासाठी

उडदाच्या डाळीमध्ये कमी चरबी असते, जी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.

फ्री रेडिकल्स

उडदाच्या डाळीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि रोगांचा धोका कमी करतात.

( नक्की वाचा : Banana benefits : 1 महिने रोज केळी खाल्ली तर दूर होतील 'हे' आजार )
 

मधुमेहासाठी

उडदाची डाळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर आहे.

ऊर्जेसाठी

उडदाच्या डाळीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा पुरवण्यास मदत करतात. तुम्हालाही उर्जेची कमतरता जाणवत असेल तर ही डाळ तुमच्यासाठी उत्तम आहे.

वजन नियंत्रित करण्यासाठी 

उडदाच्या डाळीमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असते. हे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.

( स्पष्टीकरण : ही माहिती फक्त सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क या मजकूराच्या सत्यतेची जबाबदारी घेत नाही.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: