Simple Tricks to Spot a Liar: समोरचा खोटं बोलतोय कसे ओळखायचे? 5 गोष्टींमुळे एका सेकंदात कळेल

काही लोक इतक्या आत्मविश्वासाने खोटं बोलतात की समोरच्याला त्यावर संशयही येत नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

घरी असो वा कामाच्या ठिकाणी, आपल्याला आयुष्यात अनेकदा अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो जिथे लोकं खोटे बोलतात. असं म्हणतात की एकदा खोटं बोललं की ते झाकण्यासाठी अनेकदा खोटं बोलावं लागतं. काही माणसं अशी असतात जी बेमालूमपणे खोटं बोलतात आमि त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेकजण फसतात. समोरचा खोटं बोलतोय का खरं सांगतोय हे ओळखणं अनेकदा कठीण जातं. कारण काही लोक इतक्या आत्मविश्वासाने खोटं बोलतात की समोरच्याला त्यावर संशयही येत नाही. मात्र शरीराच्या काही हालचाली, चेहऱ्यावरचे हावभाव असे असतात जे पाहून तुम्ही एका सेकंदात ओळखू शकता की समोरचा माणूस खोटं बोलतोय. 

नक्की वाचा: How Law Of Attraction Works: कोणालाही आपल्या प्रेमात पाडा, 5 टीप्स ज्यामुळे 'लॉ ऑफ अट्रॅक्शन' करेल झटकन काम

1. नजरेला नजर न देणे

असं म्हणतात की 'डोळे कधी खोटं बोलत नाही', आणि ते अगदी खरं आहे. खोटं बोलणारी व्यक्ती नजरेला नजर भिडवून बोलत नाही. खोटं बोलणारा माणूस तुमच्याकडे बघणे टाळणं पसंत करतो. जर एखादी व्यक्ती पोटतिडकीने किंवा खरं बोलत असेल तर ती आपल्याकडे बघून बोलते. त्या व्यक्तीची नजर भिरभिरत नसते.  असं करत असताना त्यांचे वर्तन हे नैसर्गिक असते, त्यात कोणताही बनावटपणा नसतो.  

2. अस्वस्थपणा

खोटं बोलताना मनात चिंता वाढते (Guilt). हा तणाव कमी करण्यासाठी लोक नकळतपणे अस्वस्थ असल्यासारखी हालचाल करतात. पाय हलवणे, बोटांनी खेळ करणे, सारखा केसांना हात लावणे— ही सर्व अस्वस्थ मनाची लक्षणे आहेत. जेव्हा तुम्ही एखादा अवघड प्रश्न विचारता आणि समोरची व्यक्ती असा रितीने अस्वस्थ हालचाली करत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की ती व्यक्ती काहीतरी लपवतेय 

Advertisement

नक्की वाचा: डार्क सर्कलमुळे तुमचे सौंदर्य बिघडलंय? हा उपाय केल्यास डोळे दिसतील प्रचंड सुंदर

3. 'डिटेल्स'चा भडिमार

खोटारडे लोकं, ते सांगत असलेली गोष्ट खरी आहे असे वाटावे किंवा त्यावर ऐकणाऱ्याचा विश्वास बसावा यासाठी गरजेपेक्षा जास्त बोलतात. ते अनेक अनावश्यक आणि अतिरिक्त तपशील (Unnecessary Details) देतात. मात्र यातून त्यांना अनेकदा कळत नाही की त्यांच्या सांगण्यामध्ये बरीच विसंगती असते. आपण प्रामाणिक आहोत हे सांगण्यासाठी एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त गोष्टी सांगत असेल तर ती तुमच्यापासून हमखास काहीतरी लपवत आहे हे लक्षात येतं.

नक्की वाचा: Simple Travel Hacks Viral Video: बॅगेत जास्त कपडे कसे भराल? काकुंनी सांगितली जबरदस्त ट्रिक; IIT ची मुलंही फेल

Advertisement

4. प्रतिसादाला विलंब 

प्रामाणिक लोक लगेच आणि नैसर्गिक प्रतिसाद देतात. खोटे बोलणाऱ्या व्यक्ती, समोरच्याला कन्व्हिन्स करण्यासाठी गोष्टी रचण्यात वेळ घालवत असते, त्यावर बराच विचार करत असते. यामुळे त्या व्यक्तीला उत्तर देण्यास विलंब होतो किंवा ती व्यक्ती उत्तर देण्यास टाळाटाळ करते.  

नक्की वाचा: दिवसातून 8 पेक्षा जास्त वेळ लघवीला होतंय! मग 'या' आजाराची आहे भिती

5. बळजबरी आणि खोटं हसणे

समरोची व्यक्ती खळखळून हसते तेव्हा आपल्याला ते पटकन कळते, त्याच रितीने समोरची व्यक्ती खोटं-खोटं हसत असेल तर ते देखील आपल्याला सहजपणे कळतं. समोरची व्यक्ती दिलखुलासपणे हसली तर आपल्याला त्यांच्या नजरेत एक समाधानाची, आनंदाची भावना चटकन दिसते. खोटं हसणाऱ्यांचं मात्र तसं नसतं. उगाच ओढून ताणून समोरची व्यक्ती हसते तेव्हा ती तणावाखाली ्सते किंवा त्यांच्या मनातील अपराधी भावना दडविण्याचा प्रयत्न करत असते.   
 

Advertisement
Topics mentioned in this article