Sleep Faster : अंथरुणावर पडताच 5 मिनिटात झोप येईल, Harvard च्या डॉक्टरांनी सांगितला गाढ झोपेचा सोपा उपाय

Tips For Better Sleep: हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या डॉक्टर त्रिशा पसरीचा यांनी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
झोप येत नसेल तर काय कराल?

Tips For Better Sleep: रात्री लवकर झोप येत नाही ही तक्रार अनेकांकडून तुम्ही ऐकली असेल. रात्री बराच काळ बेडवर लोळत पडल्यानंतरही झोप येत नाही. मनात अनेक विचार येत राहतात, परिणामी सकाळी उठताना झोप पूर्ण न झाल्यानं उत्साही वाटत नसल्याच्या समस्या अनेकांना भेडसावत असतात. दिवसभराच्या थकव्यानंतरही २-३ वाजता झोप येते. दुसऱ्या दिवशी निरुत्साही वाटते. काही जण झोपेसाठी मेलाटनिनसारखी झोपेची औषधं घेतात. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला यांपैकी कोणताही त्रास होत असेल तर तुमच्यासाठी हा लेख उपयुक्त आहे.

नुकतच हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या डॉक्टर त्रिशा पसरीचा यांनी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. ज्यामुळे झोपेचं औषध न घेता लवकर झोप येईल. याबद्दल जाणून घेऊया...

काय आहे उपाय?

डॉक्टर त्रिशाने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही झोपण्यापूर्वी तळपाय गरम कराल तर लवकर झोप येऊ शकते. यासाठी तु्म्ही चांगल्या दर्जाचे मोजे घालू शकता किंवा झोपण्यापूर्वी दहा मिनिटांपर्यंत कोमट पाण्यात पाय ठेवू शकता. यासर्वांपेक्षा जास्त म्हणजे झोपण्याच्या १-२ तासांपूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करू शकता.  

किती वेळात येते झोप?

डॉ. त्रिशा यांनी सांगितलं की, तळपाय गरम केल्याने ७-१० मिनिटात झोप येते. तर मेलाटोनिन घेतल्यानेही साधारण सात मिनिटात तुम्हाला झोप येऊ शकते. म्हणजे मोजे घालणे किंवा पाय गरम करणं मेलाटोनिनसारख्या औषधांइतका परिणामकारक ठरू शकतो.

Advertisement

नक्की वाचा - Better Sleep Tips: 5 मिनिटांत येईल गाढ झोप, झोपण्यापूर्वी दुधामध्ये चिमूटभर मिक्स करा ही पावडर

गाढ झोपेसाठी काय कराल?

गाढ झोप यावी यासाठी तुम्ही काही सोप्या गोष्टी फॉलो करू शकता
उदा...
- खोलीतील तापमान थोडंस थंड ठेवा.
- झोपण्यापूर्वी मोबाइल किंवा कोणत्याही डिजिटल स्क्रिनचा वापर कमी करा.
- झोपण्याच्या कमीत कमी ३-४ तासांपर्यंत कॅफिनचं सेवन करावं.
- रात्री कमी आहार घ्यावा.
- याशिवाय हलकी-फुलकी पुस्तकं वाचनं किंवा ध्यान लावल्याने चांगली झोप येऊ शकते.
- तुम्हालाही झोप घ्यायला त्रास होत असेल तर औषधांवर अवलंबून न राहता, घरगुती पर्यायांचा अवलंब करू शकता. 

Advertisement

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Topics mentioned in this article