Solar Eclipse 2026: सूर्यग्रहणावेळी या चुका टाळा, गर्भवती महिलांसाठी महत्त्वाच्या टिप्स; वाचा नियम सविस्तर

Surya Grahan 2026 Date and Time: वर्ष 2026मधील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी लागणार आहे. पंचांगानुसार या दिवशी माघ महिन्यातील अमावस्या तिथी देखील आहे. हे ग्रहण 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.26 वाजेपासून ते संध्याकाळी 7.57 वाजेपर्यंत असणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Surya Grahan 2026 Date and Time: सूर्य ग्रहणामध्ये काय करावे आणि काय टाळावे?
Canva

Surya Grahan 2026: वर्ष 2026मधील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी लागणार आहे. पंचांगानुसार या दिवशी माघ अमावस्या देखील आहे. हे ग्रहण दुपारी 3:26 वाजेपासून ते संध्याकाळी 7:57 वाजेपर्यंत असणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) आहे, ज्याला ‘रिंग ऑफ फायर' असेही म्हटले जाते. ही एक खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि सूर्याच्या कडेला आगीच्या वलयासारखा प्रकाश दिसतो, त्याला ‘रिंग ऑफ फायर' असे म्हणतात.

भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही?

वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. याचा प्रभाव अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांमध्ये दिसेल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते, असे मानले जाते. ग्रहण भारतात दिसत नसले तरी सूर्यकिरणांचा परिणाम काही ठिकाणी नकारात्मकरित्या जाणवू शकतो, असे म्हटलं जातं. त्यामुळे काही प्रमाणात खबरदारी घेणे आवश्यक मानले जाते. सूर्यग्रहणाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

(नक्की वाचा: Surya Grahan 2026: माघ अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा दुर्मीळ योग! सूतक काळ, काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या माहिती)

सूर्यग्रहणाच्या वेळी काय करावे? | Solar Eclipse 2026 Do's List 

  • सूर्यग्रहणाच्या वेळी पूजा आणि मंत्रजप करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या काळात नामस्मरण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे मानसिक शांती आणि सुख-समृद्धी टिकून राहते.
  • सूर्यग्रहण संपल्यानंतर स्नान करणे आवश्यक मानले जाते. तसेच ग्रहण संपल्यावर घरात गंगाजल शिंपडावे, यामुळे घराचे शुद्धीकरण होते, असे म्हणतात.
  • शास्त्रानुसार सूर्यग्रहणामुळे अन्न दूषित होते असे मानले जाते. त्यामुळे अन्न शुद्ध राहण्यासाठी ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्नात तुळशीचे पान ठेवावे.
(नक्की वाचा: Surya Grahan 2026: सूर्यग्रहण 16 की 17 फेब्रुवारी? गोंधळ दूर करा, ज्योतिषाचार्यांनी सांगितली योग्य तारीख आणि 12 राशींवर होणारा परिणाम)सूर्यग्रहणाच्या वेळी काय करू नये? | Solar Eclipse 2026 Don't List
  • सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. या काळात त्यांनी खाणे-पिणे तसेच सुई-धागा, कात्री यासारख्या वस्तूंचा वापर टाळावा.

  • शास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी घरातील किंवा मंदिरातील देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये.
  • सूर्यग्रहणाच्या वेळी कोणतेही शुभकार्य करणे टाळावे. अन्यथा कार्यात अडथळे येऊ शकतात, असे मानले जाते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)