जाहिरात

Surya Grahan 2026: माघ अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा दुर्मीळ योग! सूतक काळ, काय खावे आणि काय टाळावे? वाचा माहिती

Surya Grahan 2026: 17 फेब्रुवारी 2026 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि माघ अमावस्या एकाच दिवशी येत आहेत. पण हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सूतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे अमावस्येची पूजा, व्रत आणि तर्पण नेहमीप्रमाणे करता येतील.

Surya Grahan 2026: माघ अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा दुर्मीळ योग! सूतक काळ, काय खावे आणि काय टाळावे? वाचा माहिती
"Surya Grahan 2026: सूर्य ग्रहण भारतात दिसणार की नाही?"
NDTV Marathi

Surya Grahan 2026: खगोलीय घटनांच्या दृष्टीने 2026 हे वर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण लागणार आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. कंकणाकृती ग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, तर सूर्याची कडा अंगठीसारखा (रिंगसारखा) दिसते. याच दिवशी माघ महिन्यातील अमावस्या (Magh Amavasya) असल्याने ग्रहणाच्या वेळी अमावस्येची पूजा करता येईल का? याबाबत माहिती जाणून घेऊया... 

सूर्यग्रहण 2026ची वेळ | Surya Grahan Timing 2026

वर्षाचे पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3:26 वाजता (IST) सुरू होईल आणि संध्याकाळी 7:57 वाजता समाप्त होईल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 4 तास 32 मिनिटांचा असेल. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

माघ अमावस्या आणि ग्रहणाचा योग | Magh Amavasya 2026 Date And Time

माघ अमावस्या 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:35 वाजता सुरू होईल आणि 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.31 वाजता समाप्त होईल. उदया तिथीनुसार अमावस्या 17 फेब्रुवारीलाच मानली जाईल. म्हणजेच अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी येत आहेत.

ग्रहणाच्या वेळी पूजा करू शकतो का? | Surya Grahan 2026 Puja

धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा ग्रहण भारतात दृश्यमान असते तेव्हाच सूतक काळ लागू होतो. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सूतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे माघ अमावस्येचे व्रताचे पालन करता येईल आणि पूजा-पाठही करता येईल. कोणत्याही शुभ कार्यात अडथळा मानला जाणार नाही.

माघ अमावस्येचे महत्त्व | Magh Amavasya 2026 Importance 

अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित मानला जातो. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान आणि तर्पण करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे, त्यांनी या दिवशी तर्पण अवश्य करावे. पितरांना संतुष्ट केल्यास घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. रखडलेली कामेही पूर्ण होऊ लागतात, असे मानले जाते.

(नक्की वाचा: Surya Grahan 2026: सूर्यग्रहण 16 की 17 फेब्रुवारी? गोंधळ दूर करा, ज्योतिषाचार्यांनी सांगितली योग्य तारीख आणि 12 राशींवर होणारा परिणाम)

ग्रहणाच्या वेळी काय खावे, काय टाळावे?

सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण, कोणत्याही ग्रहणाच्या काळात शिजवलेले अन्न, तामसिक पदार्थ जसे मांस, मासे, कांदा, लसूण आणि पचनास जड अन्नपदार्थ खाणे टाळावे, अशी मान्यता आहे. कारण हे पदार्थ अशुद्ध आणि नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होतात, असे म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी ग्रहणाच्या वेळी उपवास करणे चांगले मानले जाते. काही खाणे आवश्यक असल्यास त्यात तुळशीपत्र ठेवावे आणि द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करावे. तसेच पचनास हलके आणि सात्त्विक अन्नाचे सेवन करावे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com